कृषी विभाग

कृषी विभाग

कृषी विभाग माहिती 2023 : - पाहण्यासाठी क्लिक करा

विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांची यादी

शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

१) राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

सदरची योजना केंद्र शासनाच्या अनुदाना मधून सन 1982 पासून राबविली जात आहे. केंद्र शासनाच्या नविन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्रालयाचे दिनांक 30 मे 2018 चे प्रशासकीय मंजूरी नुसार सदरची योजना 14 व्या पंचावार्षिक योजनेच्या उर्वरीत कालावधीसाठी सुधारीत अनुदान दराप्रमाणे राबविण्यात येत आहे.‏

योजनेचा उद्येश

  • स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे.
  • एलपीजी व इतर पारंपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे.
  • एकात्मिक उर्जा धोरणात नमूद केल्यानूसार स्वयंपाकासाठी आवश्यक उर्जा मिळविणे.
  • रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांचा वापर करण्यास लाभार्थींना प्रवृत्त करणे.
  • ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीनवमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे.
  • बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे.

अटी व शर्ती

  • लाभार्थींकडे पुरेशा प्रमाणात जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी लाभार्थीकडे स्वत:च्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे.
  • शेतमजूर असल्यास ग्रामसेवकाचा दाखला घेणे बंधनकारक राहील.
  • शासनाने मान्यता दिलेल्या मॉडेलच्या सयंत्राची उभारणी करणे बंधनकारक आहे.

अनुदानाचा दर

दि.30 मे 2018 नंतर उभारणी होणाऱ्या सयंत्रासाठी केंद्र शासनाचे अनुदानाचे दर खालील प्रमाणे

लाभार्थीची वर्गवारी
1 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस सयंत्रासाठ प्रती सयंत्र र.रु
2 ते 6 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस सयंत्रासाठ प्रती सयंत्र र.रु
8 ते 10 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस सयंत्रासाठी प्रती सयंत्र र .रु
15घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस सयंत्रासाठ प्रती सयंत्र र.रु
20 ते 25 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस सयंत्रासाठ प्रती सयंत्र र.रु
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गवारीतील लाभार्थीसाठी प्रती सयंत्र अनुदान

10,000/-

13,000/-

18,000/-

21,000/-

28,000/-

सर्वसाधारण वर्गवारीतील लाभार्थीसाठीप्रती सयंत्र अनुदान

7,500/-

12,000/-

16,000/-

20,000/-

25,000/-
बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडणीसाठी
1600/-
1600/-
1600/-
निरंक
निरंक

लाभधारकाने सादर करावयाची कागदपत्रे

  • शेतजमिनीचा खाते उतारा
  • शेतमजुर असल्यास त्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला
  • बायोगॅस सयंत्र पुर्णत्वाचा दाखला
  • यापुर्वी बायोगॅस सयंत्रासाठी लाभार्थीचे स्वत:चे नांवे अथवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या नांवे शासकीय अनुदान घेतले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
  • सयंत्र कार्यान्वित ठेवणेसाठी आवश्यक प्रमाणात दैनंदीन शेण-पाण्याचा वापर करणेचे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र
  • पंचायत समिती कडील अनुदान मिळणेबाबतचा विहीत नमुन्यातील प्रस्ताव
  • सयंत्र कार्यान्वित झाले नंतर सयंत्रासहीत लाभधारकाचा फोटोग्राफ.

संपर्क

योजने अंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणी करण्यास इच्छूक लाभार्थींनी ग्रामसेवक अथवा आपले तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाचे गट विकास अधिकारी/सहायक गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी(कृषि) यांचेशी संपर्क साधावा.

2) राज्य पुरस्कृत फलोत्पादन पिक संरक्षण योजना

उद्देश

सदरची योजना 100 टक्के राज्य पुरस्कृत असून सातारा जिल्हयास या योजनेमधून फलोत्पादन पिकावरील किड रोगाचे नियंत्रणासाठी किटकनाशके / बुरशीनाशकासाठी शेतकऱ्यांना अनुदान वाटापाची बाब मंजूर आहे. सदर योजनेसाठी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2017-18

‏‏‏‏‏‏‏‏योजने अंतर्गत मंजूर घटक व त्यासाठी देय अनुदान मर्यादा खालील प्रमाणे.

अ.क्र.
बाब
अनुदानाची मर्यादा रू.
1

नवीन विहिर

2,50,000/-

2
जुनी विहीर दुरुस्ती
50,000/-
3
इनवेल बोअरींग
20,000/-
4
पंपसंच
20,000/-
5
वीज जोडणी आकार
10,000/-
6
शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण
1,00,000/-
7
सूक्ष्म सिंचन संच
ठिबक संचासाठी खर्चाच्या 90 टक्के अथवा रू.50,000/- व तुषार संचासाठी खर्चाच्या 90 टक्के अथवा रू.25,000/- यापैकी कमी असेल ते अनुदान देय ®úɽұÉ.‏

योजनेच्या अंमलबजावणी बाबतच्या सुचना खालील प्रमाणे.

• योजने अंतर्गत वरील 7 बाबी असून लाभ पॅकेज स्वरूपात द्यावयाचा आहे, पॅकेजमधील एका पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय आहे.

योजने अंतर्गत एकूण 6 प्रकारच्या पॅकेजमध्ये अंमलबजावणी करणेची आहे.

• पॅकेज 1 – नवीन विहीर घेणाऱ्यासाठी पॅकेज :- सदर बाबीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास नवीन विहीर, विहीरवर पंपसंच,वीज जोडणी आकार,सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
• पॅकेज 2 – जूनी विहीर दुरूस्तीसाठी पॅकेज :- या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास, जुनी विहीर दुरूस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
• पॅकेज 3 - शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज :- ग्राम विकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये शेततळयाचे काम पुर्ण केलेले आहे अशा शेतकऱ्यास, शेततळयाचे अस्तरीकरण, वीजपंप संच, वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संचासाठी अनुज्ञेय अनुदान देण्यात येईल.
• पॅकेज 4 - ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच शासकीय योजनेतून/स्वखर्चाने विहीर काढली असल्यास :- अशा शेतकऱ्यास पंपसंच, वीज जोडणी व सूक्ष्म सिंचन संचासाठी अनुज्ञेय अनुदान देय राहिल.‏
• पॅकेज 5 - महावितरण कडून सोलर पंप मंजूर असल्यास :- विहीरीवर विद्यूतपंप बसवून ग्रीडमधून वीज पुरवठा शक्य नसल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मंजूर केलेल्या सोलर पंपासाठी लाभार्थी हिश्श्याची अनुदानाची रक्कम (पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत रु.35,000/-)‏‏‏ महावितरण कंपनीस अदा करता येईल.
• पॅकेज 6 – वरील घटकांपैकी लाभार्थीकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी‏ :- अशा शेतकऱ्यास पंपसंच,वीजजोडणी आकार व सुक्ष्म सिंचन संच या बाबींचा लाभ देता येईल.

लाभार्थी पात्रतेच्या अटी

• लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असणे आवश्यक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक
• शेतकऱ्याचे स्वत:चे नांवे जमिन धारणेचा 7/12 व 8-अ उतारा आवश्यक असून त्याचे नांवे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे
• लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
• लाभार्थ्याचे बँक खाते असणे व ते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक.
• दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य.
• दा.रे.खालील यादीत नसल्यास ज्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रू. 1,50,000/- पेक्षा जास्त नाही असा संबंधित तहसिलदार यांचेकडून सन 2018-19 चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहिल.

लाभार्थी निावडीची कार्यपध्दती

• लाभार्थी कडून अर्ज स्विकारण्यासाठी संगणक आज्ञावली (Software) विकसीत करणे. प्रत्येक वर्षी लाभार्थी निवडीसाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन गट विकास अधिकाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन स्विकारणे.
• ग्रामसभेने शिफारस केलेल्या इच्छूक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज/प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे करून प्रस्तावाची मुळ प्रत आवश्यक कागदपत्रांसह कृषि अधिकारी (विघयो),पंचायत समिती यांचेकडे स्वहस्ते जमा करावी.‏‏‎
• शेतकऱ्यांनी अर्जासोबत अर्जदाराचे छायाचित्र, जात प्रमाणपत्राची प्रत, 7/12 व 8-अ उतारा, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्डाची प्रत, बँकेच्या पास-बुकाची प्रत इ.सादर करणे आवश्यक.
• कृषि अधिकारी (विघयो) यांनी प्रस्तावाची छाननी व क्षेत्रीय पाहणी करुन पात्र प्रस्तावाची यादी ग.वि.अ.यांचे मार्फत जिल्हास्तरीय समितीकडे मंजूरीसाठी पाठवावी.
• मा.अति.मु.का.अ.यांचे अध्यक्षतेखालील समितीव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करणेची आहे, जर लक्षांकापेक्षा जास्त प्रस्ताव आल्यास जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त परिपुर्ण अर्जातून लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करावी.

घटक निहाय सविस्तर सुचना

• नविन विहीर

1. लाभार्थीने यापुर्वी केंद्र/राज्य/जिल्हा परिषद निधीतून नवीन सिंचन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.तसेच यापुर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहीलेल्या अपुर्ण विहीरीचे काम करण्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2. प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी.
3. लाभार्थीच्या 7/12 वर तसेच प्रत्यक्षात विहीर असल्यास त्याची योजनेसाठी निवड करता येणार नाही.
4. लाभधारकाकडे तलाठी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला आवश्यक.
5. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ भु-वैज्ञानिक यांचेकडील आवश्यक.
6. जीएसडीए च्या व्याखेनुसार समीक्रिटीकल/क्रीटीकल/ओव्हर एक्सप्लॉटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेता येणार नाही.
7. अंदाजपत्रकासा तांत्रिक मंजूरी देणे व काम पुर्णत्वाचे दाखले देणेची जबाबदारी उप अभियंता (ल.पा.) यांची राहिल.‏
8. नवीन विहीर पॅकेजचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना इतर पॅकेजचा लाभ अनुज्ञेय रहाणार नाही.
9. अंदाजपत्रकाप्रमाणे काम भौतिक दृष्टया पुर्ण झाल्यास अथवा अंदाजपत्रकाप्रमाणे विहीत केलेल्या खोलीपेक्षा अगोदरच 0.40 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाल्यास व विहीर सुरक्षित स्थीतीत आहे याची खात्री पटल्यास लाभार्थीचे संमत्तीने काम पुर्णत्वाचे दाखले निर्गमित करता येतील.
10. अंदाजपत्रकाप्रमाणे मंजूर रक्कम खर्च झाल्यास मात्र बांधकाम प्रलंबीत राहील्यास पुर्णत्वाचा दाखला देता येणार नाही.अशावेळी काम पुर्णत्वाचा दाखला निर्गमित करण्यात येऊ नये.
11. कामाच्या शेवटच्या हप्त्याचे अनुदान पुर्णत्वाचा दाखला,विहीरीचे लाभार्थीसह (Geo tagged) फोटो व मुल्यांकन सादर केल्याशिवाय देय राहणार नाही.‏‏‏‏‎
12. लाभार्थीची निवड होऊन कार्यारंभ आदेश दिल्यानंतर 30 दिवसांचे आत विहीरीचे काम सुरू करणे व विहित मुदतीत पुर्ण करणे बंधनकारक आहे.
13. दर 15 दिवसांनी विहीरीच्या कामाचा आढावा घेवून कामाचे अनुदान लाभार्थीचे बँक खात्यात जमा करण्यात यावे.

• जुनी विहीर दुरूस्ती

1. लाभार्थीचे 7/12 वर विहीरीची नोंद असावी‏‏.
2. अंदाजपत्रकानुसार काम विहीत मुदतीत पुर्ण करणे बंधनकारक असून अंदाज पत्रका
पेक्षा जास्त रक्कम लागल्यास सदरचा खर्च लाभार्थीने स्वत: करणेचा आहे.
3. काम वेळेत पुर्ण करण्यासाठी लाभार्थीकडून बंधपत्र घेण्यात यावेä.‎‏‏‏‏‏‏

• इनवेल बोअरींग

1. लाभार्थीने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास त्यास 20,000/- चे मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.
2. खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता भुजल सर्वेक्षण यंत्रणेकडून प्राप्त करून घ्यावे.

• पंपसंच

1. लाभार्थीस कृषि विकास अधिकारी यांनी पंपसंच खरेदीसाठी पुर्वसंमत्ती देणेची असून लाभार्थींनी एक महीन्याच्या कालावधीपर्यंत पंपसंचाची खरेदी करणे बंधनकारक आहे अन्यथा पुर्वसंमत्ती रद्द करण्यात येईल.
2. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी पंपसंचाचे रितसर तपासणी करून ते बीआयएस अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची खरेदी शेतकऱ्याने बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून स्वत:चे आधार संलग्न बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने/धनादेश/धनाकर्ष व्दारे विक्रेत्यास रक्कम आदा करून करणे बंधनकारक राहील.
3. पंपसंचाची खरेदीचे देयक पंचायत समितीस प्राप्त झाल्यानंतर व मोका तपासणी झाल्यानंतर अनुदान लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल.

• वीज जोडणी आकार

1. लाभार्थीने विद्यूत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती सादर केल्यानुसार खातरजमा करून लाभार्थीचे बँक खात्यात अनुदान जमा केले जाईल.

शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण

1. मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत ज्यांनी शेततळे काढले असेल अशा लाभार्थीस अनुदान देय राहील.
2. कृषि अधिकारी (विघयो) यांनी क्षेत्रीय पाहणी करून शेततळयाचे आकारमानानुसार आवश्यक प्लॅस्टिक कागदाचे क्षेत्रफळ व त्याचे अंदाजपत्रक निश्चित करावे.
3. ‎लाभार्थी अंदाजपत्रकानुसार 30 दिवासांचे आत शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पुर्ण करणेचे आहे.
4. सदर प्लॅस्टीक अस्तरीकरणासाठीचे परिमाण राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देय राहील.
5. प्लॅस्टीक फिल्म 500 मायक्रॉन रिइनफोर्सड एचडीपीई जीओ मेंबरेन फिल्म आयएस:15351:2015 टाईप 2 या दर्जासाठी फिल्मचा पुरवठा दर रू.70/- प्रति चौ.मी. आणि फिल्म बसविण्यासाठी रू.18/- प्रति चौ.मी. असा एकूण रू.95/- प्रति चौ.मी. निश्चित करण्यात आला आहे. यानुसार प्रत्यक्ष खर्च किंवा रू.1,00,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल त्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.‏‏‏þ‎

सुक्ष्म सिंचन संच

1. सुक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत अ.जा./ नवबौध्द शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानास पुरक अनुदान म्हणून देण्यात येईल. सदर पुरक अनुदानाची मर्यादा एकूण खर्चाच्या 90 टक्के पर्यंत अथवा रू.50,000/- ठीबकसाठी तर रू.25,000/- तुषार संचासाठी यापैकी कमी असेल ते अनुदान देय राहील.
2. जे लाभार्थी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत अर्ज करतील त्यांना उर्वरीत पुरक अनुदान डॉ.बा.आं.कृ.स्वा.योजनेमधून दिले जाईल.
3. जे लाभार्थी थेट डॉ.बा.आं.कृ.स्वा.योजनेमधून अनुदान घेण्यास इच्छूक असतील त्यांना वरील मर्यादेत अनुदान देय राहील.

योजनेंतर्गत लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज भरणे

• डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविण्यासाठी शासनाने संगणक आज्ञावली कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
• इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर आपला अर्ज ऑनलाईन भरणेचा आहे तसेच त्यासोबत आवश्यक कागदपत्रे देखील अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करणेची आहेत.(अपलोड करणेची कागदपत्रे - स्वत:च्या स्वाक्षरीसह भरलेले अर्जाची स्कॅन कॉपी, बँकेच्या पास बुकाची स्कॅन कॉपी, शेतीचा 7/12 उतारा, शेतीचा 8/अ उतारा, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला/दा.रे.खालील असले बाबत दाखला)
• सदर अर्ज संकेतस्थळावर भरणेसाठी ऑनलाईन पेमेंटपोटी लाभार्थींना रक्कम रूपये 23.60/- इतका खर्च स्वत: करणेचा आहे.
लाभार्थींनी अर्ज संकेतस्थळावर भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून सदरची प्रत आपले
कार्यक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या पंचायत समिती कार्यालयास जमा करणेची आहे.

4) पिकस्पर्धा

1) उद्येश :- धान्ये, कडधान्ये, गळीतधान्य व ऊस पिकाचे दर हेक्टरी/ एकरी उत्पादन वाढविण्याबद्दल शेतक-यामध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे हा या पिकस्पर्धा घेण्याचा उद्देश आहे. पिकस्पर्धा सर्वसाधारण गट व आदिवाशी गट या दोन गटामध्ये घेतल्या जातात.

2) पिकस्पर्धेतील पिके:- या स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश होतो.

अ) तृणधान्ये:- भात, खरीप ज्वारी, बाजरी, रब्बी ज्वारी, गहू, मका, उन्हाळीभात, नागली
ब) कडधान्ये:- हरबरा, तूर,मुग, उडीद
क) गळीतधान्य :- खरीप भुईमुग, उन्हाळी भुईमुग, करडई, सुर्यफूल, सोयाबीन, जवस, तीळ
ड) ऊस:-अ) अडसाली (ब) सुरु (खोडवा)
अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य व ऊस पिकांच्या स्पर्धा फक्त सलग पिकांसाठी (सोलक्रॉप) घेण्यात येतात.
अडसाली ऊस: ज्या पिकाची लागवड जुलै पासून सप्टेंबर अखेर पर्यत केली आहे. अशा पिकास अडसाली पिक संबोधावे.
सुरु ऊस: ज्या पिकाची लागवड ऑक्टोंबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यत केलेली आहे. अशा पिकास सुरु पिक संबोधावे.
खोडवा: फेब्रुवारी अखेरपर्यत जो ऊस तुटला आहे. अशा पिकांचाच खोडवा पिकस्पर्धेकरिता स्विकार केला जाईल. स्पर्धा केवळ पहिल्या खोडव्यापर्यंतच ठेवण्यात येईल.
टिप:- स्पर्धेच्या भूखंडात कोठे मोकळी जागा असेलतर ती रोवणी करण्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या कालावधीच्या आतच फक्त नावे देणे किंवा रोपे लावून भरुन काढता येईल.

3) पिकस्पर्धेमध्ये भाग घेणा-या स्पर्धक शेतक-याकडे लागवडीखाली आणावयाचे कमीतकमी क्षेत्र (सर्वपिकासाठी 10 आर.)

4) पीकस्पर्धा जाहीर करण्यासाठी कमीतकमी किती स्पर्धक लागतात.

पीकस्पर्धा पातळी
सर्वसाधारण गट स्पर्धक संख्या
आदिवासीगट स्पर्धक संख्या
शेरा
1) पंचायत समिती पातळीवर

10

5

प्रत्येक पिकासाठी
2) जिल्हा परिषद पातळीवर
10
5
प्रत्येक पिकासाठी
3)राज्य पातळीवर
10
5
प्रत्येक पिकासाठी

5) योजनेमध्ये सहभागासाठी अटी व शर्ती
  • शेतकऱ्याचे स्वत:चे नांवे शेतजमिन आवश्यक व सदरची शेतजमिन स्वत: कसत असणे आवश्यक.
  • कोणत्याही पातळीवरील स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकास भाग घेऊन बक्षिस मिळालेले नसेल अथवा ज्यांनी स्पर्धेतून रीतसर माघार असेल तर त्यांना पुन्हा त्याच पातळीवर त्याच हंगामासाठी त्याच पिकासाठी बक्षिस मिळेपर्यंत भाग घेता येतो.
  • ज्या स्पर्धकाने स्पर्धेत 2 रा किंवा 3 रा क्रमांकाने बक्षिस मिळविले असेल अशा स्पर्धकास पुन्हा त्याच पिकाचे स्पर्धेसाठी रीतसर भाग घेता येईल.
    सतत दोन वर्षे पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्यास स्पर्धा होऊ न शकल्यास अशावेळी स्पर्धेसाठी अर्ज करून सहभाग घेतलेल्या स्पर्धकास ती पातळी वगळून त्यापुढील पातळीवरील स्पर्धेसाठी सहभाग घेऊ शकेल.
  • एकाच वेळी एकाच पिकासाठी दोन वेगवेळया पातळीवरील स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही.
  • स्पर्धकाचे वारसदारास स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता ही वारसा हक्काने प्राप्त होऊ शकणार नाही.
  • स्पर्धा पुर्ण होणेसाठी त्या स्पर्धेमधील किमान 6 स्पर्धकांच्या पिकांची कापणी होणे आवश्यक आहे.

टिप-
1) 3 वर्षाचा कालावधी मोजताना दुष्काळी वर्ष येत असेल तर सलग वर्ष न मोजता दुष्काळी वर्ष वगळून 3 वर्षाचा कालावधी राहिल.
2) आदिवासी शेतक-यांच्या स्पर्धा अर्जा अभावी होत नसतील तर सर्वयाधारण गटा प्रमाणे अतिरिक्त फी भरुन सर्वसाधारण गटाच्या पिक स्पर्धेत आदिवासी शेतक-यांना भाग घेता येईल. कोणत्या स्पर्धेत भाग घेऊन कोणता क्रमांक मिळवला तर कोणत्या स्पर्धेत भाग घेता येईल

1
पचायत समिती पातळीवरील य्पर्धेत भाग घेऊन पिक उत्पादना प्रमाणे 1 ते 4 क्रमांक मिळविल्यास
जिल्हा परिषद पातळी वरील स्पर्धेत
2

जिल्हा परिषद पातळी वरील स्पर्धेत भाग घेऊन 1 ते 5 क्रमांक मिळविल्यास

राज्य पातळीवरील स्पर्धेत

स्पर्धा नियमावलीनुसार पुरेस अर्ज न आल्यास स्पर्धा घडून येत नाहीत. सबब होतकरु पातळीवर भाग घेता येत नाही. म्हणून विशिष्ट पातळीवर सतत दोन वर्ष अर्ज करुन देखील स्पर्धा घडून न आल्यास ती पातळी वगळून पुढील नजिकच्या पातळीवर त्या स्पर्धकांना भाग घेता येईल

  • एकाचवेळी एकाच पिकासाठी दोन पातळीवरील स्पर्धे शेतक-यांना भाग घेता येणार नाही.
  • परिक्षण समितीतील अशासकीय सदस्यांना त्याच पातळीवरील पिकस्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेता येणार नाही.
  • स्पर्धेसाठी पात्रता ही वयक्तिक गुणवत्तेनुसार प्राप्त होत असल्याने स्पर्धकाच्या वारसदारास स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता ही वारस हक्काने प्राप्त होवू शकणार नाही.

6) पिक स्पर्धसाठी प्रवेश शुल्क

निरनिराळया पातळीवरील स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क वाढविण्यात येत असून ते पुढीलप्रमाणे
अ) तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य ब) ऊस पीक स्पर्धेसाठी निनिराळया पातळीवरील प्रवेश शुल्क पुढीलप्रमाणे राहील (शुल्क रुपये)

अ.क्र
पातळी
सर्वसाधारण गट
आदिवासी गट --- अ.क्र पातळी आदिवासी गट
1.

पंचायत समिती पातळी

20/-

10.00 --- 1 पंचायत समिती पातळी 10.00
2. जिल्हा परिषद पातळी 40/- 20.00 --- 2 जिल्हा परिषद पातळी 20.00
3. राज्य पातळी 60/- 30.00 --- 3 राज्य पातळी 30.00


7) अर्ज दाखल करण्याची तारीख

निरनिराळया पातळीवरील निरनिराळया हंगामामध्ये पीक स्पर्धेचे अर्ज दाखल करण्याची तारीख पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र
पीकस्पर्धा हंगाम
अर्ज दाखल करावयाची तारीख
1

खरीप पीक स्पर्धा

प्रत्येक वर्षासाठी ऑगस्टची 15 तारीख

2 रब्बी पीकस्पर्धा प्रत्येक वर्षासाठी डिसेंअरची 31 तारीख
3 उन्हाळी हंगाम पीकस्पर्धा (वायंगण भात पिकांसाठी प्रत्येक वर्षासाठी फेब्रुवारी 15 तारीख
4 उन्हाळी पीकस्पर्धा(इतर पिकासाठी) प्रत्येक वर्षासाठी एप्रिलची 15 तारीख

ऊस पिकाच्या विविध प्रकारांसाठी अर्ज स्विकारण्याची अखेरची तारीख पढीलप्रमाणे राहिल.

1
आडसाली ऊस
15 सप्टेंबर
2

सुरु ऊस

15 फेब्रुवारी

3 खोडवा ऊस 15 फेब्रुवारी

प्रतेक वर्षातील हंगामाच्या व पिकांच्या परिस्थितीप्रमाणे अर्जे स्विकारण्याची मुदत वाढवून देण्याचा अधिकारी सबधित कृषि उपसंचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहील.

8) निरनिराळया पातळीवर पुढील प्रमाणे बक्षिसे दिेली जातील.

अ.क्र.
स्पर्धा पातळी
सर्वसाधारण गट बक्षिसे रुपये
आदिवाशी गट बक्षिसे रुपये

पहिले

दुसरे
तिसरे
पहिले
दुसरे
तिसरे
1
पंचायत समिती
2500
1500
1000
2500
1500
1000
2
जिलहा पातळी
5000
3000
2000
5000
3000
2000
3
राज्य पातळी
10,000
7000
5000
10,000
7000
5000

कोणत्या स्पर्धेत भाग घेऊन कोणता क्रमांक मिळवला तर कोणत्या स्पर्धेत भाग घेता येईल

विविध पातळीवरील बक्षिसाची रक्कम

पातळी
1 ला क्रमांक
2 रा क्रमांक
3 रा क्रमांक
तालुका पातळी

रू.2500/-

रू.1500/-

रू.1000/-
जिल्हा पातळी रू.5000/- रू.3000/- रू.2000/-
राज्य पातळी रू.10000/- रू.7000/- रू.5000/-

निरनिराळया पातळीवरील पिक स्पर्धा आयोजन व परीक्षण समिती रचना :-

अ) पंचायत समिती पातळी

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

पंचायत समितीचे सभापती

अध्यक्ष

2 पंचायत समितीचे उपसभापती सदस्य
3 गट विकास अधिकारी सदस्य
4 तालुका कृषि अधिकारी सदस्य सचिव
5 कृषि अधिकारी,पंचायत समिती. सदस्य
6 मंडल कृषि अधिकारी. सदस्य
7 पंचायत समितीने तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यामधून नियुक्त केलेला एक प्रगतशील शेतकरी (ही निवड दोन वर्षानी करावी.) सदस्य

ब) जिल्हा परिषद पातळी

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा परिषद अध्यक्ष

अध्यक्ष

2 मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य
3 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सदस्य
4 कृषि विकास अधिकारी सदस्य सचिव
5 जिल्हा परिषदेच्या कृषि समितीने जिल्हयातील प्रगतशील शेतक-यातून नियुक्त केलेला एक प्रगतशील शेतकरी (ही निवड दोन वर्षानी करावी.) सदस्य

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

विभागीय आयुक्त

अध्यक्ष

2 विभागीय कृषि सह संचालक सदस्य सचिव
3 विभागातील जेष्ठ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सदस्य
4 कृषि विकास अधिकारी (संबधीत जिल्हयाचे) सदस्य
5 प्रगतशील शेतक-यापैकी दोन प्रतिनिधी. सदस्य

6) कृषि पुरस्कार

उद्येश :- दरवर्षी राज्यात कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी, महिला शेतकरी, कृषि पत्रकार गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करणेबाबत कार्यपध्दती आणि मार्गदर्शक सूचना व पुरस्काराचे प्रकार खालीलप्रमाणे

कृषि पुरस्काराचे प्रकार

1 .डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
2. वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार
3 .वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
4. वसंतराव नाईक कृषि मित्र पुरस्कार
5. जिजामाता कृषि भूषण पुरस्कार
6. डॉ.जे.के.बसू सेंद्रीय शेती पुरस्कार

1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार:- डॉ पंजाबराव देशमुख यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या कार्याला अभिवादन त्यांच्या 101 जयंतीचे निमित्त साधून सन 2000 पासून राज्यातील कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती किंवा संस्थेस डॉ पंजाबराव देशमुख कृषि रत्न पुरस्कार देण्यात येतो. डॉ पंजाबराव देशमुख पुरस्कार हा राज्याच्या कृषि विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणा-या व्यक्ती / गट/ संस्थेस रु. 75000/- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतीचिन्हृ, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

जिल्हास्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अध्यक्ष

2 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सदस्य
3 प्रकल्प संचालक (आत्मा) सदस्य
4 कृषि विकास अधिकारी जि.प. सातारा सचिव

विभागस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

विभागीय कृषि सह संचालक

अध्यक्ष

2 विभागीय पशुसंवर्धन सह संचालक सदस्य
3 मुख्यालयाचे, जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी सदस्य
4 विभागीय पणन अधिकारी सदस्य
5 संबधित कृषि विद्यापिठाचे संचालक (विस्तार) सदस्य
6 वि.कृ.स.स. यांचे कार्यालयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सदस्य सचिव

आयुक्तालयस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

आयुक्त (कृषि)

अध्यक्ष

2 कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) सदस्य
3 कृषि संचालक (फलोत्पादन ) सदस्य
4 कृषि संचालक (मृद संधारण ) सदस्य
5 कृषि संचालक (आत्मा) सदस्य
6 कृषि संचालक (गुणनियंत्रण) सदस्य
7 व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सदस्य
8 संचालक महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद सदस्य
9. आयुक्त पशुसंवर्धन सदस्य
10 संबधित कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) सदस्य सचिव

निकष

1) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे. प्रास्तावीत गटाने किंवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
2) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.
3) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे.
4) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडूुन किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किंवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
5) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किंवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
6) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर
करणे आवश्यक आहे.

2). वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

कृषि संचालनालयाच्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 1984 सालापासून कृषि व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, विकास व मत्स्यव्यवसाय आणि सहकार व ग्रामिण विकास या क्षेत्रात अतिउत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती/ संस्थेस वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार देण्यात येतो. सध्या या पुरस्काराची संख्या 10 आहे. प्रत्येक परस्कारतीला रुपये 50,000/- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र आणि सहपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

जिल्हास्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अध्यक्ष

2 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सदस्य
3 प्रकल्प संचालक (आत्मा) सदस्य
4 कृषि विकास अधिकारी जि.प. सातारा सचिव

विभागस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

विभागीय कृषि सह संचालक

अध्यक्ष

2 विभागीय पशुसंवर्धन सह संचालक सदस्य
3 मुख्यालयाचे, जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी सदस्य
4 विभागीय पणन अधिकारी सदस्य
5 संबधित कृषि विद्यापिठाचे संचालक (विस्तार) सदस्य
6 वि.कृ.स.स. यांचे कार्यालयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सदस्य सचिव

आयुक्तालयस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

आयुक्त (कृषि)

अध्यक्ष

2 कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) सदस्य
3 कृषि संचालक (फलोत्पादन ) सदस्य
4 कृषि संचालक (मृद संधारण ) सदस्य
5 कृषि संचालक (आत्मा) सदस्य
6 कृषि संचालक (गुणनियंत्रण) सदस्य
7 व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सदस्य
8 संचालक महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद सदस्य
9. आयुक्त पशुसंवर्धन सदस्य
10 संबधित कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) सदस्य सचिव

निकष

1) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे.प्रास्तावीत गटाने किंवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
2) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.
3) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पाश्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन/कृषि क्षेत्रात सहभाग असणे आवश्यक आहे.
4) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किंवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
5) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किंवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
6) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.
7) जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रास भेट देवून संबंधिताने केलेल्या कार्याची खात्री करुन प्रस्ताव निकषाप्रमाणे योग्य असल्यासच प्रपत्रामध्ये शिफारशीसह अभिप्राय द्यावेत. यामध्ये सबंधित शेतक-यांनी कृषि विकास, विस्तार, सामुहिक कृषिपणन व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले आहेत काय. याबाबत सविस्तर अभिप्राय असणे आवश्यक आहे.
8) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतक-याबाबतच कृषि भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा.
9) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान 5 वर्षा इतके असावे.
10) सबंधिताकडून ते शासन किंवा शासनअंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसलेबाबत रु. 100/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेणेत यावे.

3) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार

पुरस्काराचे स्वरुप

शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवीन पध्दतीने पिक लागवड, इतर शेतक-यांना मार्गदर्शन करणे शासन/सहकारी संस्थेकडून घतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर इत्यादी निकषा अंतर्गत शेतक-याचे एकंदरीत कार्य विचारात घेवून राज्य शासनाच्या कृषि विभागाकउून सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतक-यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये 11000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र व सहपत्नीक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे:-

तालुकास्तरीय समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

सभापती पंचायत समिती

अध्यक्ष्ष

2 मंडल कृषि अधिकारी सदस्य
3 पशुधन अधिकारी सदस्य
4 कृषि अधिकारी पंचायत समिती सदस्य
5 तालुका कृषि अधिकारी सदस्य सचिव

जिल्हास्तरीय निवड समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा कृषि विषयक समितीचे सभापती

अध्यक्ष

2 जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सदस्य
3 प्रकल्प संचालक (आत्मा) सदस्य
4 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सदस्य
5 कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद सदस्य सचिव

विभागीय स्तरावरील समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

विभागीय आयुक्त (महसूल)

अध्यक्ष

2 विभागीय कृषि सहसंचालक सदस्य
3 विभागीय कृषि सहसंचालक (पशुसंवर्धन) सदस्य
4 अधिक्षक कृषि अधिकारी(वि.कृ.स.सं.यांचे कार्यालय सदस्य सचिव

निकष

1) प्रस्तावासोबत सर्व कागदपत्रे जसे 7/12, उतारा,जिल्हा पोलीस, अधिक्षक यांचेकडुन चारित्र्य निर्दोष दाखल्याची मुळप्रत इत्यादी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची राहील.
2) एकापेक्षा जास्तवेळा शेतीनिष्ठ म्हणून शेतक-याची निवड केली जाणार नाही याची खात्री करुन घ्यावी. तसेच सदर शेतकरी एखादया संस्थेकडुन अगर शासनाकडून मानधन किंवा निवृत्ती वेतन घेत नाही याची खात्री करुन तसे अभिप्राय दयावेत.
3) दोन्ही गटाचे बाबतीत 5 किंवा त्याहून जास्त सालदार ठेवलेल्या शेतक-यांची शिफारस करु नये.
4) प्रत्येक गटास ज्या तीन शेतक-यांचा प्रस्ताव पाठविला जाईल त्या शेतक-यांचे तीन पासपोर्ट साईज तीन छाया चित्रे टाचणी न लावता पाकीटात घालुन छायाचित्राच्या मागे सुवाच्छ अक्षरात नाव, गाव, तालुका, जिल्हा व गटाचा (सर्वसाधारण/अदिवासी)उल्लेख करुन पाठवावेत.
5) प्रस्तावित शेतक-यांचे संपुर्ण नाव पत्ता प्रस्तावामध्ये प्रथम दर्शनी सुवाच्छ अक्षरात लिहावा. प्रस्तावात अचुक/संपुर्ण नाव न लिहले गेल्यास सन्मानपत्र,परिचयपुस्तिका ,ओळखपत्र यामध्ये चुकीचे नाव लिहले जाऊ शकेल. ही बाब कृपया लक्षात घ्यावी.
6) पहिल्या तीन क्रमांकाच्या परिचय लेख (थोडक्यात)स्वतंत्रपणे तयार करुन स्वता: पाठवावेत.त्या शेतक-यांनी केलेली पीकविषयक कामगिरी,जमिन सुधारणा, सुधारीत बियाणे,किटकनाशके यांचा वापर जोडधंदा, कंपोस्ट व रासायनिक खताचा वापर/गोबर गॅस प्लॅन्ट तसेच त्यांनी मागील तीन वर्षा मध्ये काढलेले पिकनिहाय हेक्टरी उत्पादन झालेला फायदा इ. मुद्याचा समावेश असावा.
7) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान 5 वर्षा इतके असावे.

4) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

पत्रकारितेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषि क्षेत्रात विस्तार आणि मार्गदर्शनाबाबत बहूमोल कामगिरी करणारा शेतकरी / व्यक्ती /संस्था त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी सलग्न घरगुती उद्योग उदा. कुकूटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादी मधील वैशिष्टयपूर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयमधून परसबाग वृध्दींगत करणा-या महिला इत्यादींना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 1984 पासून वसंतराव नाईक शेतीमित्र हा बहुमान प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. रुपये 30,000/- रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

जिल्हास्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अध्यक्ष

2 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सदस्य
3 प्रकल्प संचालक (आत्मा) सदस्य
4 कृषि विकास अधिकारी जि.प. सातारा सचिव

विभागस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

विभागीय कृषि सह संचालक

अध्यक्ष

2 विभागीय पशुसंवर्धन सह संचालक सदस्य
3 मुख्यालयाचे, जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी सदस्य
4 विभागीय पणन अधिकारी सदस्य
5 संबधित कृषि विद्यापिठाचे संचालक (विस्तार) सदस्य
6 वि.कृ.स.स. यांचे कार्यालयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सदस्य सचिव

आयुक्तालयस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

आयुक्त (कृषि)

अध्यक्ष

2 कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) सदस्य
3 कृषि संचालक (फलोत्पादन ) सदस्य
4 कृषि संचालक (मृद संधारण ) सदस्य
5 कृषि संचालक (आत्मा) सदस्य
6 कृषि संचालक (गुणनियंत्रण) सदस्य
7 व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सदस्य
8 संचालक महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद सदस्य
9. आयुक्त पशुसंवर्धन सदस्य
10 संबधित कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) सदस्य सचिव

निकष

1) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे.प्रास्तावीत गटाने किंवा संस्थेने केलेले कार्यसंपूर्णराज्याला दिशादर्शक असावे.
2) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.
3) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पाश्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग असणे आवश्यक आहे.
4) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किंवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
5) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किंवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
6) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

5) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार

राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असून शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होवून इतर महिलामध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने कृषि क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या महिला शेतक-यांना सन 1995 पासून जिजामाता कृषि भूषण देण्यात येतो राज्यातून दरवर्षी पाच महिला शेतक-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येतो. पुरस्कार्थी महिलांना प्रत्येकी रु 50000/-(रु.पन्नास हजार फक्त) रोख आणि स्मृतीचिन्ह व पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

जिल्हास्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अध्यक्ष

2 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सदस्य
3 प्रकल्प संचालक (आत्मा) सदस्य
4 कृषि विकास अधिकारी जि.प. सातारा सचिव

विभागस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

विभागीय कृषि सह संचालक

अध्यक्ष

2 विभागीय पशुसंवर्धन सह संचालक सदस्य
3 मुख्यालयाचे, जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी सदस्य
4 विभागीय पणन अधिकारी सदस्य
5 संबधित कृषि विद्यापिठाचे संचालक (विस्तार) सदस्य
6 वि.कृ.स.स. यांचे कार्यालयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सदस्य सचिव

आयुक्तालयस्तर समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

आयुक्त (कृषि)

अध्यक्ष

2 कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) सदस्य
3 कृषि संचालक (फलोत्पादन ) सदस्य
4 कृषि संचालक (मृद संधारण ) सदस्य
5 कृषि संचालक (आत्मा) सदस्य
6 कृषि संचालक (गुणनियंत्रण) सदस्य
7 व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सदस्य
8 संचालक महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद सदस्य
9. आयुक्त पशुसंवर्धन सदस्य
10 संबधित कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) सदस्य सचिव

निकष

1) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे. प्रास्तावीत गटाने किंवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
2) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश
करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.
3) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे.
4) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किंवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
5) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किंवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
6) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर
करणे आवश्यक आहे.
7) जिजामाता कृषिभूषण पुरस्कारा साठी शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनीच प्रस्ताव सादर करावा.
8) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान 5 वर्षा इतके असावे.

6) डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण

पुरस्काराचे स्वरुप

समिती खालील प्रमाणे

तालुकास्तरीय समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

पंचायत समिती सभापती

अध्यक्ष

2 उप सभापती पचायत समिती सदस्य
3 गट विकास अधिकारी सदस्य
4 तालुका कृषि अधिकारी सदस्य
5 कृषी अधिकारी पं.स. सदस्य सचिव
6 मुख्यालयाचे पशुधन विकास अधिकारी सदस्य सचिव

जिल्हास्तरीय निवड समिती

अ.क्र
परीक्षण व निरीक्षण समिती
हुद्दा
1

जिल्हा परिषद अध्यक्ष

अध्यक्ष

2 कृषि,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समितीचे सभापती सदस्य
3 अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य
4 कृषि विकास अधिकारी सदस्य सचिव
5 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सदस्य

निकष

सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनीय काम तसेच आधुनिक तत्रंज्ञानाचा वापर करुन शेतीचे उत्पादन करणारा सातारा जिल्हयातील कोणताही शेतकरी या पुरस्कारासाठी निवडीमध्ये भाग घेऊ शकेल. सदरचा पुरस्कार केवळ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देणेत येतो व त्याचे वितरण दरवर्षी 1 जुलै या दिवशी केले जाते. डॉ.जे.के.बसू हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे मृदा शास्त्रज्ञ होते.सन 1925 ते 1940 या काळात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव येथे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण कालवा विभागातील ऊस जमिनीचे सर्वेक्षण करून ऊसाखालील जमिनींचे वर्गीकरण केले.सदर सर्वेक्षणानुसार त्यांनी अ,ब,क,ड,ह,फ या जमिनींच्या प्रकारान्ुसार ऊस लागवडीसाठी दोन सरीतील अंतर,पाण्याच्या पाळया,ऊसाचे वाण,खतांच्या मात्रा निश्चित करण्याचे संशोधनात्मक कामकाज केले.भारतात अशा प्रकारचे मृद सर्वेक्षण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.जमिनीच्या प्रकारानुसार ऊसाकरीता केलेल्या सदरहू शिफारशी मुळे ऊसाचे उत्पादन वाढू लागले व त्याचा बहूसंख्य शेतकऱ्यांना होऊ लागला.अशा प्रकारे महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षणाच्या कामाचा पाया डॉ.जे.के.बसू यांच्या कारकिर्दीत घालण्यात आला.सन 1999-2000 मध्ये त्यांचे सुपुत्र मा.श्री.रतिकांत बसू यांनी सातारा जिल्हयास सहकुटुंब भेट दिली. त्याचवेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास देखील भेट देऊन सदर भेटीवेळी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.दिलीप बंड यांचे कडे डॉ. जे.के.बसू यांचे स्मृती प्रिथ्यर्थ शेतकऱ्यांसाठी काही मदत करण्याचे मत मा.श्री.रतिकांत बसू यांनी व्यक्त केले.त्यास अनुसरून सातारा जिल्हयातील सेंद्रीय व आधुनिक शेती मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देणेची संकल्पना बसू कुटुंबियांनी मान्य करून त्यासाठी त्यांनी रूपये 1.00 लाखाची रक्कम कायम स्वरूपी ठेव जिल्हा परिषदेस सुपुर्द केली.सदर पुरस्कारासाठी व्यक्ती/संस्थांची निवड करणेसाठी मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती निश्चित करण्यात आली आहे.जि.प.कडे सदरच्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या शेतकऱ्यांस बक्षिसाची रक्कम रोखीने दिली जात आहे.

7) यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन व यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन मित्र पुरस्कार

कृषि पर्यटन हा शेतीपुरक व्यवसाय करण्यास अत्यंत योग्य भौगोलिक परिस्थिती सातारा जिल्हयात आहेä.‏‏‏‏ सदर व्यवसाय करण्यासाठी अनेक शेतकरी जिल्हयात इच्छूक असून सध्या अनेक शेतकरी कृषि पर्यटन व्यवसायाकडे वळले आहेत. सातारा जिल्हा परिषदेमार्फत स्वयंस्फुर्तीने कृषि पर्यटनास चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. या व्यवसायामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने काम केल्यास व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो व शेतकऱ्यास शेती बरोबरच कृषि पर्यटन व्यवसायामधून देखील चांगला अर्थिक नफा मिळण्यास मदत होत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या कृषि पर्यटनाच्या चालना देण्याच्या धोरणास जिल्हयातील शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहे. कृषि पर्यटन व्यवसायामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन गौरव पुरस्कार व कृषि पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यास यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटनमित्र पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन 2016-17 पासून सुरूवात करण्यात आली आहे.

पुरस्काराचे नांव:- यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन गौरव पुरस्कार व यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटनमित्र पुरस्कार

पुरस्कारासाठी पात्रता

कृषि पर्यटन व्यवसायामध्ये तसेच त्याचे प्रसारासाठी उल्लेखनिय काम करणारा सातारा जिल्हयातील कोणताही कृषि पर्यटन केंद्र चालक शेतकरी सदर पुरस्कारासाठी निवडीमध्ये भाग घेऊ शकेल.

पुरस्काराचे गुणांकनासाठी कार्यपध्दती

सदर पुरस्कार मागील 3 अर्थिक वर्षी शेतकऱ्याने केलेल्या कामकाजाचा कालावधी मुल्यांकनासाठी गृहीत धरण्यात येईल.मुल्यांकनासाठी कृषि विकास अधिकारी यांनी दोन्ही पुरस्कारांसाठी स्वतंत्र मुद्देनिहाय प्रपत्र विहित करावे व त्यामध्ये शेती बरोबर कृषि पर्यटनाच्या सर्वांगीन बाबींचा समावेश करावा.सदरचे प्रपत्राव्दारे एकूण 450 गुणांचे गुणांकन करावे त्यापैकी 150 गुण पंचायत समितीस्तरावर तर 300 गुण जिल्हास्तरावर देण्यासाठी निश्चित करावे.

पुरस्कारार्थीचे निवडीसाठी निवड समितीची रचना

सदरच्या दोन्ही पुरस्कार्थीचे निवडीसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर समिती राहील. पंचायत समितीस्तरावर संबंधित पंचायत समितीचे सभापती यांचे अध्यक्षतेखाली गट विकास अधिकारी व कृषि अधिकारी पं.स. अशी एकूण 3 सदस्यीय समिती राहील.कृषि अधिकारी पं.स.सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहतील.सदर समितीव्दारे प्राप्त प्रस्तावातील शेतकऱ्याचे कृषि पर्यटन केंद्राची/कामाची क्षेत्रीय पाहणी करून 150 गुणांपैकी योग्य गुण देऊन प्रस्ताव जि.प.ला सादर करतील. जिल्हास्तरावर मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद सातारा यांचे अध्यक्षतेखाली, मा. सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी अशी एकूण 4 सदस्यांची समिती राहील. कृषि विकास अधिकारी जि.प.सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहतील.सदर समितीव्दारे प्राप्त प्रस्तावातील शेतकऱ्याचे शेतीच्या व कृषि पर्यटन केंद्राच्या विकासाची क्षेत्रीय पाहणी करून 300 गुणांपैकी योग्य गुण देतील.अशा रीतीने पं.स.स्तर अधिक जि.प.स्तर मिळून एकूण 450 गुणांपैकी मिळालेले गुण एकत्र करून गुणानुक्रम निश्चित करावा व त्यामधून शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करावी. पुरस्कार्थी निवडीची संख्या निश्चित करणेचा अधिकार समितीचे अध्यक्ष यांना राहिल.

पुरस्काराचे वितरण व कालावधी

पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरस्कार्थींना सातारा जिल्हा परिषदेमार्फत प्रमाणपत्र, स्मृतीचीन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यांचे सन्मानपुर्वक विरतण करावे. पुरस्कार्थींना दरवर्षी 1 जुलै या कृषिदिन कार्यक्रमामध्ये इत्यादींचे सन्मानपुर्वक वितरीत करावे.

जिल्हा परिषद स्वीय निधीतील व्यक्तीगत लाभाच्या योजना

जिल्हा परिषद स्वीय निधीमधून अल्प/अत्यल्प भुधारक शेतकरी/मागासवर्गीय शेतकरी/महीला शेतकऱ्यांना सायकल कोळपी,स्प्रेपंप,कडबाकुटी यंत्र,ताडपत्री, सुधारीत/संकरीत बियाणे,युरीया ब्रिकेट,गांडूळ कल्चर/खत,नारळ रोपे,पाईप, विद्यूत पंपसंच, डिझेल इंजिन इत्यादी बाबींचा 50 टक्के अनुदानावर लाभ देणेत येतो. तसेच जिल्हयातील विविध सहकारी संस्था/साखर कारखाने कारखाने /कृषि उत्पन्न बाजार समित्या यांचेमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कृषि प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने सहभाग घेऊन कृषि उत्पादन वाढीचे तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणेत येतो. त्याचप्रमाणे सन 2014-15 पासून जिल्हयात कृषि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थिक फायदा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून कृषि पर्यटनास चालना देणे करीता जिल्हा परिषदेच्या स्विय निधीमधून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेची नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात येत आहे. ‏‎‏‏‏

8) नाविन्यपूर्ण योजना अतंर्गत कृषि पर्यटन केंद्र प्रशिक्षण

सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतू शेती क्षेत्र ही पर्यटनाचे स्थळ होऊ शकेल. यातुन "कृषी पर्यटन" संकल्पनेचा उदय झाला. या योजनेची वैशिष्टये

1) कृषि विज्ञान केंद्रव्दारे प्रशिक्षणाचे आयोजन.
2) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कृषि संलग्न विभागासेाबत कार्यशाळेचे आयोजन.
3) जिल्हा परिषद स्वनिधी मधून कृषि पर्यटनास चालना देणेची योजना.

9) नाविन्यपुर्ण योजना अंतर्गत सातारा ऑरगॅनिक उपक्रमास चालना देणे

देशात हरित क्रांतीनंतर अन्नधान्य व कृषि उत्पादन वाढीसाठी सुधारित, संकरीत जातीच्या बियाणेचा वापर वाढला तसेच अधिक उत्पादन काढण्यासाठी सिंचन सुविधा, रासायनिक खतांचा वापर, पिकांवरील किड/रोगांचे नियंत्रणासाठी किटकनाशके/बुरशीनाशके यांचा वापर शेतकरी मोठया प्रमाणावर करु लागले, सुरवातीच्या काळात रासायनिक खताला प्रतिसाद मिळाल्याने कृषि उत्पादनात देखील मोठया प्रमाणावर वाढ झाली. परंतु मर्यादित क्षेत्रातुन अधिकाअधिक कृषि उत्पादन वाढीसाठी शेतक-यांमध्ये स्पर्धा होऊन रासायनिक खते, किटकनाशके व सिंचनाचा अतिरिक्त वापर होऊान लागला आहे. त्याचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसून येत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडून शेती उत्पादनामध्ये रासायनिक खतांचे, किटकनाशकांचे अंश राहिल्याने विषयुक्त अन्नाचे सेवन होऊन लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
या दुष्पपरिणामांवर उपाययोजना म्हणून सेंद्रीय शेती पध्दतीचा अंगीकार करणे ही काळाजी गरज निर्माण झालेली आहे.

त्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देणे, सेंद्रीय कृषि उत्पादनांचे आरोग्याच्या दृष्टिने फायदे, विषमुक्त अन्न म्हणजे काय, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणे, सेंद्रीय शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, सेंद्रीय शेती बाबत तज्ञांमार्फत शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेती कशी व का करायची याचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे इत्यादी साठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन 2015-16 पासून सातारा ऑरगॅनिक हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. सातारा ऑरगॅनिक उपक्रमातंर्गत तालुक्यात सेंद्रीय शेती करणारे 32 शेतक-यांची तालुका तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत वर नमुद केले प्रमाणे सेंद्रीय शेतीच्या विविध संकल्पना शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर पाहण्यास व अनुभवन्यास मिळणेसाठी शालेय विद्यार्थ्याच्या सहलीचे आयोजन करणेत आले आहे. शालेय विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याचे मोबदल्यात त्यांना कृषि विभागा मार्फत मानधनपोटी अनुदान ही देण्यात येत आहे. योजनेतंर्गत नेमणुक केलेल्या मार्गदर्शक तज्ञावर विविध जबाबदा-या निश्चित करणेत आल्या आहेत.

योजनेचा उद्देश

शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देऊन सेंद्रीय कृषि उत्पादन घेण्याबाबतच्या संकल्पनेचा विस्तार घरोघरी पोहचविणे हा प्रमुख उद्देश प्रस्तावित योजनेमधून साध्य करावयाचा आहे. सेंद्रीय शेतीच्या विविध संकल्पना शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर पाहण्यास व अनुभवन्यास मिळणेसाठी विद्यार्थ्याच्या सहलींचे आयोजन तालुक्यासाठी नेमलेल्या तज्ञ मार्गदर्शक शेतक-यांचे शेतावर करणेत आले आहे.जेणेकरुन विद्यार्थी सेंद्रीय शेतीची संकल्पना आत्मसात करतील तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व वाढीस लागेल व त्याचा प्रचार व प्रसार करतील.

जिल्हा परिषद सेस निधी मधून शेतकऱ्यांना व्यक्तीगत लाभाच्या खालील प्रमुख योजनांचा लाभ देण्यात येतो.

1) शेतकऱ्यांना अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप योजना :- जनावरांना वापरण्यात येणाऱ्या चाऱ्याची उपयुक्तता वाढविणेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येते.यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

2) शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन साहीत्याचे वाटप करणेची योजना :- ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध आहे अशा गरजू शेतकऱ्यांना विद्यूतपंपसंच,डीझेल इंजिन अथवा पेट्रोडीझेल इंजिन तसेच एचडीपीई पाईप सारख्या सिंचन साहीत्याचे 50 टक्के अनुदानावर वाटप केले जाते.‏‏ यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

3) शेतकऱ्यांना अनुदानावर ताडपत्री वाटप योजना :- धान्याचे पावसापासून संरक्षण करणे, मळणी वेळी धान्याची साठवणूक करणे इत्यादी साठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर ताडपत्रींचे वाटप जिल्हा परिषद सेस योजनेमधून केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

4) शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारीत/संकरीत बियाणे वाटप योजना :- बियाणे बदलाचा दर वाढवून पिकांचे प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणेसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर भात,ज्वारी,बाजरी,मका,सोयाबीन,भुईमुग,वाटाणा,घेवडा इत्यादी पिकांचे संकरीत/सुधारीत वाणाचे बियाणेचे वाटप केले जाते.‏ यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

5) शेतकऱ्यांना अनुदानावर पिक संरक्षण आयुधांचे वाटप करणेची योजना :- पिकांचे किड व रोगा पासून संरक्षण करणेसाठी शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप,इंपोर्टेड स्प्रेपंप,एचटीपी स्प्रेपंप इत्यादी पिक संरक्षण आयुधांचे वाटप 50 अनुदानावर वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

6) शेतकऱ्यांना अनुदानावर सायकल कोळप्यांचे वाटप योजना :- पिकातील आंतरमशागतीचे काम करणे,तण नियंत्रण करणे यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर सायकल कोळप्यांचे वाटप केले जाते.‎‎ यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

7) शेतकऱ्यांना कृषि पर्यटनासाठी प्रोत्साहन देणेची योजना

1. सातारा जिल्हा वैशिष्ठयपुर्ण जिल्हा असून जिल्हयास एैतिहासिक व भौगोलिक वारसा लाभलेला आहे.जिल्हयाच्या पश्चिमेकडील भागात सहयाद्रीच्या डोंगररांगा, जंगल, नदयांचे उगमस्थान असून अनेक देवस्थान जिल्हयात आहेत. तसेच पुर्व भागामध्ये विस्तृत पठारी प्रदेश आहे.
2. जिल्हयात बाजरी पासून स्ट्रॉबेरी, भात,ऊस या सारख्या विविध पिक पध्दतींचा समावेश आहे.जिल्हयाची वैशिष्ठयपुर्ण भौगोलिक परिस्थिती कृषि पर्यटनास पुरक असल्याने व शेतीस उत्तम पुरक व्यवसाय असल्याने कृषि पर्यटन व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर संधी जिल्हयातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.मात्र हा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने केल्यासच किफायतशीर हेाऊ शकतो हि बाब लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन 2014-15 पासून कृषि पर्यटनास चालना देणेची नाविन्यपुर्ण योजना सुरू केली. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे अंदाजपत्रकात तरतुद करण्यात आली.
3. सदरचा व्यवसाय करण्यास इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत एकत्रित केले व त्यांना जिल्हा परिषदेकडून कोणकोणत्या बाबीसाठी मदत/सहकार्य अपेक्षित आहे याची माहीती घेण्यात आली.त्यामध्ये इच्छूक शेतकऱ्यांना कृषि पर्यटनाचे तांत्रिक व सखोल प्रशिक्षणाची आवश्यक आहे हे लक्षात आले.कृषि पर्यटन व्यवसाय यशस्वीपणे राबविणेसाठी केंद्र चालकांना सखोल प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने सन 2014-15 पासून कृषि पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्र,बारामती येथे निवासी प्रशिक्षण देणेची योजना सुरू केली. व त्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निधीमधून प्रशिक्षण देणेची सोय निर्माण केली.
4. सन 2014-15 मध्ये 37, सन 2015-16 मध्ये 40 तर सन 2016-17 मध्ये 35, सन 2017-18मध्ये ---- व सन 2018-19 मध्ये ------ शेतकऱ्यांना बारामती येथे निवासी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच तालुकास्तरावरील क्षेत्रीय कृषि अधिकाऱ्यांना देखील या प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेण्यात आले,जेणेकरून तालुकास्तरावर कृषि पर्यटनाबाबची माहीती शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना कृषि पर्यटनाशी निगडीत अनेक विषयांचे सखोल मार्गदर्शन तज्ञांमार्फत करण्यात आले.
5. कृषि पर्यटन व्यवसाय करीत असताना त्यामध्ये आलेल्या अनुभवांची देवाण घेवाण करण्यासाठी जिल्हयातील कृषि पर्यटन केंद्र चालकांचे मासिक चर्चासत्र जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरचे चर्चासत्रामध्ये या व्यवसायातील अडीअडचणी व त्यावरील उपाययोजनां बाबत सखोल चर्चा करण्यात येते.जिल्हयात तसेच परजिल्हयात ज्या ठिकाणी यशस्वीपणे कृषि पर्यटन सुरू आहे तसेच ज्या ठिकाणी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला जात आहे अशा कृषि पर्यटन केंद्रांना इच्छूक केंद्रचालकांची क्षेत्रीय भेट देणेची योजना सन 2016-17 मध्ये सुरू करण्यात येत आहे.
6. कृषि पर्यटनास शासनाची कोणतीही योजना सद्यास्थितीत सुरू नाही. परंतू कृषि पर्यटनामध्ये अंर्तभूत असलेल्या फळबाग, गांडुळ प्रकल्प, रेशीम उद्योग, शेततळे, रोपवाटीका यासारख्या बाबींच्या शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने कृषि पर्यटनधारकांना करण्यास जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे.
7. कृषि पर्यटनास चालना देण्याच्या उद्येशाने शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करणे देखील आवश्यक असून जिल्हा परिषदेने सन 2015-16 पासून उत्कृष्ट कृषि पर्यटन केंद्रचालकास कृषि पर्यटन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.जिल्हयात सन 2013-14 मध्ये केवळ 5-6 कृषि पर्यटन केंद्र सुरू झाली होती, मात्र जिल्हा परिषदेने या संकल्पनेमध्ये पुढाकार घेतल्याने महाराष्ट्र कृषि पर्यटन विकास महामंडळाकडे 86 कृषि पर्यटन केंद्रांची नोंदणी झाली असून त्यापैकी ‏‏ 50 ते 60 इतकी कृषि पर्यटन केंद्र सुरू झाली आहे.
8. कृषि पर्यटनाच्या शेती पुरक व्यवसायामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात मोठया प्रमाणावर वाढ झालेचे दिसून येते. सदरची वाढ हि रू.50,000/- पासून रू .2,50,000/- प्रति महिना इतकी झालेली आहे.यावरून सदरचा व्यवसाय यशस्वीपणे राबविला जात असल्याचे दिसून येते.

8) शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणेच्या योजना

1. रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे सामान्य लोकांचे आरोग्याचे प्रश्न गंभिर स्वरूप धारण करू लागले आहेत. लोकांना विषमुक्त अन्न खायला मिळावे यासाठी उत्पादक शेतकरी तसेच उपभोक्ता सामान्य नागरीक यांचे मध्ये रासायनिक खतांचे व किटकनाशकांचे दुष्परीणामाबाबत व्यापक जागृती निर्माण करणे हि काळाची गरज आहे किंबहुना आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सदरच्या समस्येवर मात करण्यासाठी सेंद्रीय शेतीस व सेंद्रीय उत्पादन खरेदीसाठी प्रोत्साहन देणे शिवाय पर्याय नाही. या सामाजिक हिताच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांच्या सहभागातून सातारा ऑरगॅनिक हा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविला जात आहे.
2. सातारा ऑरगॅनिक उपक्रमाचा शुभारंभ जिल्हयाचे मा.पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आला.
3. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सेंद्रीय शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करणे, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून देणे, त्यांचे मार्फत उत्पादीत होणाऱ्या सेंद्रीय शेतमालाची माहिती संकलित करणे, सेंद्रीय शेत मालाच्या विक्रीसाठी जि.प.च्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देणे, सेंद्रीय शेतीचे उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती संकलित करणे, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी व ग्राहक यांचेमध्ये समन्वय साधून उत्पादक-ग्राहक साखळी निर्माण करून देणे यासारख्या विविध प्रक्रीया जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहेत.
4. सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करणेसाठी जिल्हयात तालुकानिहाय सेंद्रीय शेती तज्ञ समन्वयक यांची नेमणूक जिल्हा परिषदेने करून दिली असून या समन्वयांकाकडे जिल्हयातील इतर शेतकऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा व शिवार फेरी आयोजित करण्यात येते व या कार्यशाळे मध्ये सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येते. कार्यशाळा ज्या समन्वयकाच्या शेतात आयोजित केली जाते त्यास जिल्हा परिषद निधीमधून प्रति कार्यशाळा रूपये 7500/- मानधन व उपस्थितांना चहा-पाणी व भोजन इत्यादीचे खर्चासाठी देण्यात येते.‏‎‏‎
5. शालेय विद्यार्थ्यांना देखील सेंद्रीय शेतीचे महत्व व प्रत्यक्ष सेंद्रीय शेती विषयक संकल्पना पटवून दिल्यास त्याचा संदेश विद्यार्थ्याच्या कुटुंबापर्यत पोहचविला जाणार आहे, हि बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदांकडील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन सेंद्रीय शेती समन्वयक शेतकऱ्याच्या शेतावर केले जाते व त्यापोटी समन्वयकास जिल्हा परिषद निधीमधून रू.1000/- मानधन देण्यात येते.
6. शालेय विद्यार्थी व सेंद्रीय शेती समन्वयकांना सेंद्रीय शेती मधील विविध संकल्पनांची शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून देणेसाठी जिल्हा परिषदेने पुस्तिका तयार करून दिली आहे.यामध्ये सेंद्रीय शेतीच्या सर्व संकल्पना मोजक्या शब्दात रंगित सचित्र स्वरूपात दिली आहे. जिल्हा परिषदेने या पुस्तिकेच्या 3000 प्रती वाटप केल्या आहेत.
7. तसेच सेंद्रीय शेती मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेमार्फत दर वर्षी 1 जुलै या कृषि दिनी डॉ.जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यामध्ये रोख रक्कम, प्रशिस्तीपत्र, सन्मानचिन्ह, पुछपगुच्छ इ. चे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येते.
8. रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे सामान्य लोकांचे आरोग्याचे प्रश्न गंभिर स्वरूप धारण करू लागले आहेत. लोकांना विषमुक्त अन्न खायला मिळावे यासाठी उत्पादक शेतकरी तसेच उपभोक्ता सामान्य नागरीक यांचे मध्ये रासायनिक खतांचे व किटकनाशकांचे दुष्परीणामाबाबत व्यापक जागृती निर्माण करणे हि काळाची गरज आहे किंबहुना आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सदरच्या समस्येवर मात करण्यासाठी सेंद्रीय शेतीस व सेंद्रीय उत्पादन खरेदीसाठी प्रोत्साहन देणे शिवाय पर्याय नाही.या सामाजिक हिताच्या ‏समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांच्या सहभागातून सातारा ऑरगॅनिक हा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविला जात आहे.
9. सातारा ऑरगॅनिक उपक्रमाचा शुभारंभ जिल्हयाचे मा.पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आला.
10. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सेंद्रीय शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करणे, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून देणे, त्यांचे मार्फत उत्पादीत होणाऱ्या सेंद्रीय शेतमालाची माहिती संकलित करणे, सेंद्रीय शेत मालाच्या विक्रीसाठी जि.प.च्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देणे, सेंद्रीय शेतीचे उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती संकलित करणे, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी व ग्राहक यांचेमध्ये समन्वय साधून उत्पादक-ग्राहक साखळी निर्माण करून देणे यासारख्या विविध प्रक्रीया जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहेत.
11. सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करणेसाठी जिल्हयात तालुकानिहाय सेंद्रीय शेती तज्ञ समन्वयक यांची नेमणूक जिल्हा परिषदेने करून दिली असून या समन्वयांकाकडे जिल्हयातील इतर शेतकऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा व शिवार फेरी आयोजित करण्यात येते व या कार्यशाळे मध्ये सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येते. कार्यशाळा ज्या समन्वयकाच्या शेतात आयोजित केली जाते त्यास जिल्हा परिषद निधीमधून प्रति कार्यशाळा रूपये 7500/- मानधन व उपस्थितांना चहा-पाणी व भोजन इत्यादीचे खर्चासाठी देण्यात येते.
12. शालेय विद्यार्थ्यांना देखील सेंद्रीय शेतीचे महत्व व प्रत्यक्ष सेंद्रीय शेती विषयक संकल्पना पटवून दिल्यास त्याचा संदेश विद्यार्थ्याच्या कुटुंबापर्यत पोहचविला जाणार आहे, हि बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदांकडील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन सेंद्रीय शेती समन्वयक शेतकऱ्याच्या शेतावर केले जाते व त्यापोटी समन्वयकास जिल्हा परिषद निधीमधून रू.1000/- मानधन देण्यात येते.
13. शालेय विद्यार्थी व सेंद्रीय शेती समन्वयकांना सेंद्रीय शेती मधील विविध संकल्पनांची शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून देणेसाठी जिल्हा परिषदेने पुस्तिका तयार करून दिली आहे.यामध्ये सेंद्रीय शेतीच्या सर्व संकल्पना मोजक्या शब्दात रंगित सचित्र स्वरूपात दिली आहे. जिल्हा परिषदेने या पुस्तिकेच्या 3000 प्रती वाटप केल्या आहेत.
14. तसेच सेंद्रीय शेती मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेमार्फत दर वर्षी 1 जुलै या कृषि दिनी डॉ.जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यामध्ये रोख रक्कम, प्रशिस्तीपत्र, सन्मानचिन्ह, पुछपगुच्छ इ. चे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येते.

9) किटकनाशकांमुळे विषबाधा होऊ नये यासाठी विविध
1. किटकनाशकांचा वापराची पध्दत, किटकनाशक वापराची योग्य वेळ, औषधांची निवड, फवारणीसाठी वापरावयाचे स्प्रेपंपाचे प्रकार, किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी, मान्यता प्राप्त औषधे व किड/रोग निहाय वापराचे प्रमाण,किटकनाशकांमुळे विषबाधा झाल्यास त्यास अँटीडोटस, किटकनाशकांच्या फवारणी नंतर शेती उत्पादने वापरण्यासाठीचा योग्य कालावधी यासारख्या अनेक बाबींचे ज्ञान शेतकऱ्यांना अपुरे असते त्यामुळे किटकनाशकांच्या वापरावेळी विषबाधा होण्याचा धोका असतो. किटकनाशक विक्रेत्यांचा शेतकऱ्यांशी सततचा संपर्क असतो यासाठी शेतकऱ्यांना किटकनाशकांच्या फवारणी व वापरांसंबंधिची माहिती देण्यामध्ये या विक्रेत्यांचा सहभाग महत्वाचा आहे.
2. सातारा जिल्हा परिषदेमार्फत जिल्हयातील सर्व किटकनाशक विक्रेत्यांची कार्यशाळा दिनांक 7 नोव्हेबर 2017 रोजी शाहु कला मंदीर येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वरील सर्व बाबींचे सखोल मार्गदर्शन उपस्थित किटकनाशक विक्रेत्यांना करण्यात आले व कार्यशाळेतील मार्गदर्शन/माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सदर विक्रेत्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले.
3. सदर कार्यशाळेमध्ये केंद्रीय किटकनाशक मंडळाकडे नोंदणीकृत किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके,पीजीआर इ. चा पिक निहाय वापर, त्यांची मात्रा, विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, विषबाधा झाल्यास अँटीडोटस, किटकनाशक विक्रीमध्ये विक्रेत्यांची जबाबदारी इ. सर्व तांत्रिक व उपयुक्त माहिती समाविष्ट असणाऱ्या पिक संरक्षण मार्गदर्शक पुस्तिका या पुस्तिकेचे विमोचन करून या पुस्तिकेचे वाटप सर्व किटकनाशक विक्रेते व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना करण्यात आले. सदर पुस्तिकेतील माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
4. किटनाशकांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हयात शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्हयात 7 तालुक्यामध्ये शेतकरी मंळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे 9300 शेतकऱ्यांना किटकनाशकाच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
5. किटकनाशकांच्या फवारणीवेळी शेतकऱ्यांनी संरक्षक किट वापरणे आवश्यक असून किटकनाशकाच्या फवारणीमुळे विषबाधा होऊ नये यासाठी या किटचा वापर प्रतिबंधत्मक उपाययोजना म्हणून करणे गरजेचे आहे व याचा प्रचार होणे देखील महत्वाचे आहे. सदर किटच्या वापराचे महत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर एकूण 5000 किटचे वाटप करण्याची नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात येत असून त्यासाठी जिल्हा परिषद सेस मधून रू.5 लक्ष तरतुद मंजूर करण्यात आली आहे.
6. जिल्हयातील सर्व किटकनाशक विक्रेते व किटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने देखील शेतकऱ्यांना सदरच्या संरक्षक किटची उपलब्धता करून देण्यात येत आहे. आता पर्यंत जिल्हयात सुमारे 13,500 संरक्षक किटचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

10) शेतकऱ्यांना शेतीविषयक कामे सेवा पुरवठादारांच्या गटाकडून करून देणे

1. शेतकऱ्यांना प्रचलीत भाडेदरापेक्षा कमी दराने शेती विषयक सेवा उपलब्ध उपलब्ध करून देणे.
2. पिकाच्या पेरणीपासून काढणीपश्चात प्राथमिक प्रक्रिपर्यंत यांत्रिकीकरणाची भाडेतत्वावर सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
3. बेरोजगार कृषि पदवीधारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे व गटास सेवा पुरवठादार म्हणून घोषित करणे व त्यास विविध औजारांचे भांडवली खर्चासाठी अर्थसहाय्य करणे.
4. कृषि पदवीधारांच्या गटामार्फत सेवा पुरविली जाणार असल्याने कृषि उत्पादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करणे.
5. सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध स्तरावरील समस्यांची सोडवणूक करणे.
6. पिक संरक्षण फवारणीसारख्या कामामध्ये अज्ञानी शेतकऱ्यांच्या जिवाची जोखीम कमी करणे.
7. वरील सर्व बाबी विचारात घेऊन जिल्हा परिषदेमार्फत नाविन्यपुर्ण योजना राबविणेचा निर्णय घेतला आहे.‏‏
8. सदर योजने मध्ये प्रामुख्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये शेती विषयक विविध सेवा उपलब्ध करून देणे असून त्यासाठी सेवापुरवठादाराची सुविधा निर्माण करणे हा उद्देश आहे.
9. सदरची सेवा पुरविणेसाठी जिल्हयातील बेरोजगार कृषि पदवीधर व कृषि पदविकाधारक, इतर शाखेचे पदवी/पदविकाधारक यांच्या किमान 10 शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांचे मार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक सेवा उपलब्ध करून देणे व सदर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित गटाला लागणाऱ्या विविध कृषि औजारे,साहीत्य,मशिनरी यांचे खरेदीसाठी जिल्हा परिषदेमार्फत औजारांच्या किंमतीच्या 40 टक्के अथवा रूपये 3.00 लाख प्रति गट अर्थसहाय्य अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या गटाकडे किमान 100 मजूर नोंदणी असणे व गट आत्मा कडे नोंदणीकृत असणे बंधनकारकारक आहे.
10. सदर योजनेमधून प्रत्येक तालुक्यातून एका सेवा पुरवठादार गटाकडून किमान 100 हेक्टर क्षेत्रावर सेवा शेतकऱ्यांना सेवा उपलब्ध करून देणेची असून सन 2017-18 मध्ये जिल्हयात या माध्यमातून 1100 हेक्टर क्षेत्रावर कार्यक्रम राबविण्यात येत +ɽä.‏‏‏‏

11) जिल्हा परिषद गटांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीशाळा आयोजित करणे

1. कृषि उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान,कृषि विषयक माहीती इत्यादी बाबी शेतकऱ्यांमध्ये प्रसारीत होणे आवश्यक असते.कृषि विद्यापीठामध्ये पिकांचे उत्पादन वाढीसाठी संशोधन केले जाते असे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
2. त्यासाठी विविध प्रचार-प्रसार माध्यमांचा वापर केला जातो.तसेच जिल्हा परिषदेमार्फत देखील विविध शेती विषयक उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी गावातील शेतकरी समुदायाने सामाजिक भावनेतून एकत्र येऊन प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत व संशोधनात्मक पध्दतीचा अवलंब करून क्षेत्रीय प्रात्याक्षिकांच्या अभ्यासाव्दारे व मार्गदशनाव्दारे एकात्मिक पीक व्यस्थापनासाठी शेतीशाळा हा एक अत्यंत प्रभावी उपक्रम आहे.
3. गांव पातळीवर आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकत्र येऊन कृषि विषयक तंत्रज्ञानाच्या माहीतीची देवाण घेवाण करून तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणेसाठी सन 2017-18 पासून सातारा जिल्हयातील एकूण 64 जिल्हा परिषद गटामध्ये शेतीशाळेचा उपक्रम राबविणेचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
4. सदर उपक्रमांतर्गत महिन्याच्या 1 ल्या व शेवटच्या आवठवडयात दोन-दोन अशा एकूण 4 शेतीशाळांचे आयोजन दर महिन्यात करण्यात येत आहे. अशा प्रकारे जिल्हयातील 64 जि.प.गटामध्ये शेतीशाळांचे नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे.
5. सदर कार्यशाळेमध्ये कृषि विभागाबरोबरच पशुसंवर्धन विभागाचा देखील सहभाग असतो व त्यामध्ये सकाळच्या सत्रात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे तपासणीचे शिबिर घेतले जाते व त्यानंतर शेतकऱ्यांना कृषि विषयक माहितीचे मार्गदर्शक केले जाते