जावली तालुका

जावली तालुका

जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण मेढा आहे.

जावली

जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली. जावलीचे मोरे हे इतिहास प्रसिध्द घराणे असून, स्वतःला सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचे वंजश मानतात. त्यापैकी चंद्रराव मोरे हे शिवाजी महाराजांना शत्रू मानत होतेच् १६५७ पासून या भागावर शिवाजी महाराजांची सत्ता स्थापन झाली.

वासोटा किल्ला

महाराष्ट्रातील मोजक्या वन दुर्गापैकी एक दुर्ग म्हणजे वासोटा किवा व्याघग्रगड होय. हा जावली तालुक्यात शिवसागर जलाशयाजवळ आहे. समुद्रसपाटीपासून उंची ३७०० फूट आहे. पन्हाळयाच्या शिलाहार घराण्यातील शेवटचा राजा दुसरा भोज याने हा किल्ला बाराव्यात शतकाच्या उत्तरार्धात बांधला. शिवाजी महाराजांनी याचे नाव वज्रगड असे केले होते.

वासोटा किल्ला

मेरुलिग मंदिर

मेरुलिग जावली तालुक्यातील तीर्थक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील मेरुलिग पर्वतावर मेरुलिग मंदिर व मेरुलिग गाव वसले आहे. हे गाव म्हणजे एक निसर्गरम्य व शीतल गिरीस्थान आहे.

बामणोली व तापोळे

शिवसागर जलाशयाच्या काठावरील ही रम्य ठिकाणे आहेत. महाबळेश्वरच्या टप्प्यात असल्याने व बोटिगसारख्या सुविधा येथे उपलब्ध असल्याने नवे पर्यटन स्थळ म्हणून त्यांचा झपाट्याने विकास होत आहे.