वाई तालुका

वाई तालुका

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते वाई म्हणजे विणकर लोकांची वस्ती होती. डॉ. ह. वि. संकलिया या संशोधकांच्या मते, या गावाचे नाव इ.स.वी. सनाच्या आठव्या शतकात वायी असे होते. त्यामुळे वायी असे नाव पडले. कालांतराने त्याचे नाव वाई असे झाले.

वाई शहर

कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून विख्यात धार्मिक् क्षेत्र आहे. नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्यमूर्ती, सिध्देश्वर मंदिर,त्यातील सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर,काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदास स्वमी स्थापित रोकडोबा हनुमान मंदिर इ. मंदिरे आहेत. स्वामी केवलनांद यांनी येथे प्राज्ञ पाठशळेची स्थापना केली. विश्वकोशाचे प्रकाशन येथून होते. आजपर्यन्त विश्वकोषाचे १६ खंड प्रकाशित झाले आहेत. कृष्णामाई महोत्सव व वसंत व्याख्यान माला दोन महत्वाचे वार्षिक उत्सव आहेत. वाईपासून जवळच भृगू ऋषींची समाधी आहे. वाईमधील गणपती आळीतील लो. टिळक ग्रंथालयाला १९९० साली महाराष्रूट्र राज्याचा उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पु१रस्कार प्राप्त झाला. १९९१-९२ मध्ये ग्रंथालयाने हीरक महोत्सव साजरा केला. या ग्रंथालयात ३० हजाराच्यावर गंथ संपदा आहे. वाईहून २ कि.मी. अंतरावर पाचगणी घाटात रेशीम उत्पादन केंदग आहे. येथे एकर क्षेत्रावर तुतीची लागवड होत असून त्यावर रेशमी किडे पासले जातात.

वाई शहर

ढोल्या गणपती मंदिर

या मंदिरामुळे वाईची प्रसिध्दी वाढली आहे. गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर १७६२ साली पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभार्‍यात गणपतीची पाषाणाची ६ फूट व लांबी ७ फूट अशी बैठकी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाला तीन्ही बाजूंनी कमानी आहेत.

ढोल्या गणपती मंदिर

काशिविश्वेश्वर मंदिर

गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. पूर्वेस महाव्दार व तयावरती नगारखान्याची खोली आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रुंद अशी भित आहे. महाव्दारातून आत गेल्यावर दगडी मंडप, दोन दीपमाळा व नंदी मंडप दिसतो. या नंदीची भव्य मूर्ती कुळकुळीत अशा चकचकीत पाषाणाची व सुबक आहे. गाभार्‍यात खालवर खाली शिवलिग आहे.

रायरेश्वर

रायरेश्वर डोंगरावरील रायरेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या मावळयांसमवेत हिदी/ हिदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. गडावरुन वाई व भोरचा परिसर तसेच पश्चिमेस कोकण प्रांतातील सावित्री नदीचे खोरे दृष्टीस पडते.

रायरेश्वर

धोम

वाईपासून ९ कि.मी. अंतरावर असलेले धोम धरण. येथेच कृष्णा नदीच्या काठावर बांधलेलं महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे.

भुईज

हे गाव सातारा-पुणे रस्त्यावर वसले आहे. भृग ऋषींची समाधी येथे आहे. त्या नावावरुन या गावाला भुईज नाव पडले. मंदिराच्या खाली ऋषींची समाधी व ध्यान धारणेची खोली आहे.

काळूबाई मंदिर, मांढरदेव

महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेले व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले काळुबाई ठाणे, मांढरदेवी डोंगरावर आहे. डोंगराच्या पठारावर मांढरदेव हे गांव आहे. या पठराची समुद्र सपाटीपासून उंची ४५१७ फूट आहे. काळूबाईचे मंदिर ३५० वर्षापूर्वीचे आहे.

काळूबाई मंदिर, मांढरदेव

मेणवली

कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत. घटावरील एका छोटया मंदिरात भली मोठी धातूची घंटा अडकविली आहे. वसई युध्दातील विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी येथील किल्ल्यावरुन पोर्तुगीजांची ही १ क्विटल वजनाची घंटा येताना विजय चिन्ह म्हणून आणली होती. नदी काठावरील घाट चंद्रकोरी आकाराचा असून मेणवलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

रेशीम केंद्र

वाईपासून २ कि.मी. अंतरावर पाचगणी घाटात रेशीम उत्पादन केंद्र आहे. या केंद्रात रेशीम धागा तयार केला जातो. तसेच जिल्हयातील रेशीम उद्योग विस्तार कामे केली जातात. पर्यटकांसाठी येथे एका मार्गदर्शकाची नेमणूक केली आहे. येथे ८ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड असून त्यावर रेशीम किडे पोसले जातात. या किड्यांच्या कोशापासून धागा काढला जातो. येथील रेशीम कापड स्वस्त दरात विकत मिळते.

पांडव गड

वाई शहरापासून चार मैलावर वायव्य दिशेला हा गड आहे. चौकोनी आकाराचा माथा असलेला हा गड आहे. पन्हाळ्याचा शिलाहार राजा भोज याने इ.स. १२०० च्या दरम्यान हा किल्ला बांधला.गडावर जाण्यासाठी पहिला डोंगर चढून दुसरा उंच डोंगर चढावा लागतो. वाटेत विही री आहेत. पायवाट अरुंद व धोक्याची आहे. माथ्यावर पाण्याची अनेक तळी आहेत. पडलेल्या वाड्याच्या मध्यभागी पांडजाई देवीचे व दुसरे एक अशी देवीची दोन मंदिरे आहेत.

वैराटगड

वाई शहराच्या आग्नेय दिशेला ८ कि.मी. अंतरावर वैराटगड आहे. हा गडही पन्हाळ्याचे शिलाहार राजाने बांधला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद व कच्चा आहे. गडावरचा सपाट भाग थोडा रुंद आहे. गडावर शंकर दत्त आणि मातंगी देवी यांची मंदीरे आहेत. गडावर काही चोरवाटा आणि चोरघरे आहेत. आणिबाणीच्या प्रसंगी दडून राहण्यासाठी याचा वापर केला जात असे. या गडावर एक वैशिष्ट्यपूर्ण असे एक तळघर आहे. जमिनीच्या आत असलेले हे तळघर अतिशय विस्तृत आहे. २०० फूट पेक्षा जास्त लांब हे भूयार आहे.

केंजळगड

वाई शहराच्या वायव्येला सपाट चौकोनी आकाराचा माथा दृष्टीस पडतो तोच हा केंजळगड, हा गड रायरेश्वर व पांडवगड या किल्ल्यांच्यामध्ये आहे.

केंजळगड

कमळगड

कमळगड हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक गड आहे. खाली निळे पाणी आणि वर निळे आकाश यांच्या पार्श्वभूमीवर कमळगड शोभून दिसतो. या गडाला कोणतेही बांधकाम नाही यतो मुद्दाम कोणी बांधला असेल असे वाटत नाही. यालाच नवरा नवरीचा डोंगर असेही म्हणतात.