बंद

    पं.स माण

    माण तालुका – संक्षिप्त माहिती

    १) क्षेत्रफळ

    माण तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 668.04 चौ.किमी आहे.

    तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी असून “माण” नावाचे स्वतंत्र शहर किंवा गाव तालुक्यात अस्तित्वात नाही. प्रत्यक्षात माण हे नदीचे नाव असून त्यावरूनच तालुक्याला माण तालुका असे नाव देण्यात आले आहे.

    दहिवडी हे तालुक्याचे मुख्यालय असून म्हसवड हे तालुक्यातील मोठे शहर व नगरपरिषद आहे. दहिवडी शहरास नगरपंचायत दर्जा आहे.

    हा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी असल्याने पाण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तालुक्याला शहराच्या नावाऐवजी नदीच्या नावावरून “माण” असे नाव देण्यात आले आहे.


    २) लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार)

    • एकूण लोकसंख्या : 2,25,634

    • पुरुष : 1,14,202

    • स्त्रिया : 1,11,432

    लोकसंख्येचे विभाजन

    • ग्रामीण लोकसंख्या : 2,01,514

    • शहरी लोकसंख्या : 24,120


    ३) प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे

    • शिखर शिंगणापूर – शंभू महादेव मंदिर

    • अनभुलेवाडी (लक्ष्मीनगर) – श्री महालक्ष्मी मंदिर

    • शिरवली – हनुमान मंदिर

    • म्हसवड – श्री सिद्धनाथ–जोगेश्वरी मंदिर

    • दहिवडी – श्री काशीपाते नीलकंठ महाराज

    • जांभूळणी – श्री भोजलिंग व जोगेश्वरी मंदिर

    • मोही – श्री महालक्ष्मी मंदिर

    • मार्डी – भवानी आई मंदिर

    • पिंगळी बुद्रुक – पिंगळजाई मंदिर

    • गोंदवले बुद्रुक – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

    • मलवडी – खंडोबा मंदिर, श्री महंत शांतिगिरीजी महाराज

    • पांगरी – बिरोबा–सतोबा

    • कुळकजाई – सीताबाई मंदिर

    • किरकसाल – श्री नाथ मंदिर

    • कुकुडवाड – महादेव मंदिर

    • मंकलेश्वर (धुलोबा) – धुळदेव मंदिर

    • विरकरवाडी – नागोबा मंदिर

    • इत्यादी


    ४) ऐतिहासिक माहिती

    • माणदेश हा राष्ट्रकूट राजा मानांक (इ.स. ३७५) यांच्या साम्राज्याचा भाग होता. त्यांची राजधानी माणपूर (माण) येथे असल्यामुळे या प्रदेशास माणदेश हे नाव मिळाले असावे, असे मानले जाते.

    • छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या साखळी किल्ल्यांपैकी महिमानगड किल्ला माण तालुक्यात आहे.


    ५) प्राथमिक शाळा

    • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा : 269

    • खाजगी प्राथमिक शाळा : 90


    ६) अंगणवाडी

    • एकूण अंगणवाडी संख्या : 412


    ७) आरोग्य सुविधा

    • प्राथमिक आरोग्य केंद्र : 6

    • उपकेंद्रे : 35


    ८) गण / गट

    • गट : 05

    • गण : 10


    ९) पशुवैद्यकीय दवाखाने

    • श्रेणी एक : 6

    • श्रेणी दोन : 8


    १०) नगरपंचायत

    • संख्या : 01

    • नाव : दहिवडी नगरपंचायत, दहिवडी


    ११) नगरपरिषद

    • संख्या : 01

    • नाव : म्हसवड नगरपरिषद, म्हसवड


    १२) नद्या, धरणे व किल्ले

    • नदी : माणगंगा नदी

    • धरणे : आंधळी, राजेवाडी

    • किल्ले : वारुगड, महिमानगड

    नकाशा/Maps

    Man

    Google Maps links

    माण तालुका | जिल्हा परिषद सातारा | भारत