बंद

    पं. स खटाव

    तालुका : खटाव

    १. क्षेत्रफळ :
    1364 चौ.कि.मी.

    २. लोकसंख्या :
    एकूण लोकसंख्या – 2,75,274
    पुरुष – 1,36,802
    स्त्रिया – 1,38,472


    ३. तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती :

    औंध वस्तुसंग्रहालय :
    औंध येथील हे प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी बांधले आहे. येथे 8,000 पेक्षा अधिक दुर्मिळ व मौल्यवान वस्तू संग्रहित आहेत. विविध प्रदेशांचे वैशिष्ट्य दर्शविणारी चित्रे, संगमरवरी शिल्पे, कोरीव धातू व लाकडी वस्तू, हस्तिदंत कोरीव कलाकृती तसेच स्ट्रॉंगरूममधील ऐतिहासिक रत्ने येथे पाहावयास मिळतात. सध्या हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे.

    मायणी पक्षी अभयारण्य :
    अनुकूल हवामान, खाद्य व निवाऱ्याची मुबलक व्यवस्था यामुळे देश-विदेशातील विविध जातींचे पक्षी हिवाळ्यात येथे वास्तव्यास येतात. गरुड, ससाणा, फ्लेमिंगो, बदके, सारस (कारकोचा), पाणबुडे व नाम्या पक्षी येथे मोठ्या संख्येने आढळतात. सुमारे 1.5 हेक्टर परिसरात विस्तारलेले हे अभयारण्य ‘इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य’ म्हणून ओळखले जाते.

    यमाई देवी मंदिर, औंध :
    औंध गावाशेजारी असलेल्या ‘मूळपीठ’ नावाच्या सुमारे 800 फूट उंच डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवी ही औंधची ग्रामदेवता तसेच पंतप्रतिनिधी घराण्याची कुलदेवता असून ती महाराष्ट्रातील पंचमहादेवतांपैकी एक आहे.

    पुसेगाव :
    येरळा नदीच्या काठावर वसलेले पुसेगाव नाथपंथियांच्या अकरा लिंगांपैकी एका लिंगासाठी प्रसिद्ध आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी असून त्यांनी 10 जानेवारी 1947 रोजी समाधी घेतली.

    गुरसाळे :
    वडूजपासून सुमारे 9 कि.मी. अंतरावर असलेल्या गुरसाळे गावात 13व्या शतकातील रामलिंग मंदिर व सोमलिंग मंदिर आहेत.


    ४. तालुक्याची ऐतिहासिक थोडक्यात माहिती :

    खटाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असले तरी सर्व प्रशासकीय कार्यालये वडूज येथे आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. छत्रपती शिवाजी महाराज, लुत्फुल्लाखान व कृष्णराव खटावकर यांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश वेगवेगळ्या काळात होता.

    कटगुण :
    थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगाव.

    नेर तलाव :
    पुसेगावजवळील नेर गावात असलेला हा ब्रिटिशकालीन तलाव इ.स. 1873 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या काळात सिंचन विभागामार्फत बांधण्यात आला. तलावाच्या मध्यभागी टेकडी असून त्यावर चैतोबाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे पाण्याची पातळी वाढली तरी मंदिराकडे जाणारी पायवाट कधीही पाण्याखाली जात नाही.

    गुरसाळे :
    या गावात 13व्या शतकातील रामलिंग व सोमलिंग मंदिरे ऐतिहासिक वारसा जपून उभी आहेत.


    ५. प्राथमिक शाळांची संख्या :

    एकूण 84

    ६. प्राथमिक आरोग्य केंद्रे / उपकेंद्रे :
    प्राथमिक आरोग्य केंद्रे – 9
    उपकेंद्रे – 41

    ७. अंगणवाडींची संख्या :
    एकूण 464

    ८. गण / गट संख्या :
    गण – 14
    जिल्हा परिषद गट – 7

    ९. जनावरांच्या दवाखान्यांची संख्या :
    एकूण 18

    १०. नगरपरिषद / नगरपंचायत :
    नगरपंचायत – वडूज, ता. खटाव, जि. सातारा (एक)


    ११. नद्या / धरणे / किल्ले :

    नद्या : येरळा
    धरणे : येरळवाडी, नेर, येळीव, मायणी
    किल्ले : भूषणगड, वर्धनगड

    नकाशा- खटाव

    Khatav

     

    गुगल नकाशा दुवा/Google Maps link

    खटाव तालुका | जिल्हा परिषद सातारा | भारत