पं.स पाटण
पाटण तालुका – संक्षिप्त माहिती
१) क्षेत्रफळ
-
१,४०,३६४ हेक्टर
२) लोकसंख्या
-
एकूण लोकसंख्या : २,९९,५०९
-
पुरुष लोकसंख्या : १,४५,०७४
-
स्त्रिया लोकसंख्या : १,५४,४३५
३) तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती
-
कोयना धरण
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक. याचा विस्तीर्ण जलाशय ‘शिवसागर जलाशय’ म्हणून ओळखला जातो. -
नेहरू उद्यान
कोयना धरणाजवळ असलेले निसर्गरम्य उद्यान. पर्यटकांसाठी विश्रांतीचे उत्तम ठिकाण. -
ओझर्डे धबधबा
पावसाळ्यात प्रवाहित होणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. -
कोयना वन्यजीव अभयारण्य
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पसरलेले अभयारण्य, समृद्ध जैवविविधता व निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध. -
चाफळ राम मंदिर
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाचे मंदिर. -
सडा वाघापूर उलटा धबधबा
जोरदार वाऱ्यामुळे पाणी खाली न पडता वरच्या दिशेने उडते. पावसाळ्यात हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. -
वाल्मिक पठार
याच ठिकाणी वाल्या कोळीने तपश्चर्या करून वाल्मिक ऋषी झाले अशी आख्यायिका आहे. वांग नदीचे उगमस्थानही येथेच आहे. -
K2 पॉईंट
कोयना धरणाच्या बॅकवॉटरचे अत्यंत नयनरम्य दृश्य येथे पाहायला मिळते. -
धारेश्वर व रुद्रेश्वर महादेव मंदिरे
भगवान शिवांना समर्पित ऐतिहासिक मंदिरे. -
दातेगड किल्ला
तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला किल्ला.
याशिवाय बहुलेश्वर महादेव मंदिर, कोंडावळे धबधबा, घाटमाथा तसेच पावसाळ्यातील अनेक छोटे-मोठे धबधबे व हिरवीगार डोंगरदऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
४) तालुक्याची ऐतिहासिक माहिती
-
बहुलेश्वर व धारेश्वर ही मंदिरे शिलाहार / यादव काळातील मानली जातात.
-
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात डोंगरदऱ्या व जंगलामुळे हा भाग रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा होता.
-
चाफळ येथे समर्थ रामदास स्वामींच्या कार्यामुळे हा प्रदेश आध्यात्मिक दृष्ट्या प्रसिद्ध झाला.
-
स्वातंत्र्यलढ्यात पाटण तालुक्याने त्याग व बलिदानाचे मोलाचे योगदान दिले आहे.
५) प्राथमिक शाळा
-
५२१
६) आरोग्य सुविधा
-
प्राथमिक आरोग्य केंद्रे : १३
-
उपकेंद्रे : ६४
-
आयुर्वेदिक दवाखाने : ०२
-
कुटीर रुग्णालये : ०२
७) अंगणवाडी संख्या
-
७२९
८) गण / गट संख्या
-
गट : ०७
-
गण : १४
९) पशुवैद्यकीय दवाखाने
-
१९
१०) नगरपंचायत
-
नाव : पाटण नगरपंचायत
-
संख्या : ०१
११) नद्या
-
कोयना
-
केरा
-
मोरणा
-
वांग
-
उत्तरमांड
-
तारळी
१२) धरणे
-
कोयना धरण
-
मोरणा (गुरेघर)
-
वांग–मराठवाडी
-
तारळी
१३) किल्ले
-
दातेगड
-
भैरवगड
नकाशा- पाटण

गुगल नकाशा दुवा/Google Maps link