पं.स. फलटण
फलटण तालुका – संक्षिप्त माहिती
(जिल्हा : सातारा)
१) भौगोलिक स्थिती
फलटण तालुका सातारा जिल्ह्याच्या उत्तर बाजूस स्थित असून,
-
उत्तरेस : पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होते.
-
पुणे जिल्हा व फलटण तालुक्याच्या सरहद्दीवर : निरा नदी वाहते.
-
पूर्वेस : सोलापूर जिल्ह्याची हद्द लागते.
२) प्रशासकीय रचना
-
महसुल गावे : १३०
-
ग्रामपंचायती : १३१
-
नगरपालिका : ०१
३) लोकसंख्या (जनगणना २०११)
-
एकूण लोकसंख्या : ३,४२,६६७
-
पुरुष : १,७६,२५०
-
स्त्रिया : १,६६,४१७
४) क्षेत्रफळ व जमीन उपयोग
-
एकूण भौगोलिक क्षेत्र : १,१७,७५६ हेक्टर
-
बागायत क्षेत्र : ५७,३४१ हेक्टर
-
जिरायत क्षेत्र : ४१,०३० हेक्टर
५) दळणवळण व सुविधा
-
तालुक्यातील जवळपास सर्व गावे मुख्य रस्त्यांना जोडलेली आहेत.
-
सर्व गावांना एस.टी. (राज्य परिवहन) सेवा उपलब्ध आहे.
६) विकासात्मक कार्यक्रम
-
विकासासाठी असलेल्या २० कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे.
७) पर्जन्यमान व हवामान
-
तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
-
सरासरी वार्षिक पर्जन्यमान : ४५० मि.मी.
-
तालुका कायमस्वरूपी दुष्काळी असल्यामुळे शेती उत्पन्न मर्यादित मिळते.
-
सन २०२४–२५ मध्ये : १८४.१० मि.मी. पाऊस पडला असून, तो सरासरीपेक्षा अधिक आहे.
८) ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व
-
श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे
तरडगाव, फलटण व बरड येथे तीन मुक्काम असतात. -
फलटण शहर हे महानुभाव पंथीयांचे ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते.
-
येथे संत हरीबाबा महाराज व संत उपळेकर महाराज यांची समाधी आहे.
-
अनेक जुनी व प्रसिद्ध मंदिरे फलटण शहरात आहेत.
-
फलटण शहर हे श्री छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ आहे.
९) औद्योगिक वसाहत
-
फलटण तालुक्यात सुरवडी येथे औद्योगिक वसाहत आहे.
-
सहकारी साखर कारखाने : ०२
-
दूध प्रकल्प : ०३
नकाशा- फलटण
