पं.स वाई
तालुका : वाई
१. क्षेत्रफळ :
623.13 चौ.कि.मी.
२. लोकसंख्या (पुरुष / स्त्रिया) :
पुरुष – 99,865
स्त्रिया – 100,404
एकूण लोकसंख्या – 200,269
३. तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती :
मांढरदेव, धोम धरण, वाई येथील महागणपती मंदिर ही तालुक्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत.
४. तालुक्याची ऐतिहासिक थोडक्यात माहिती :
वाई तालुक्याला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई शहर प्राचीन काळी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जात होते. महाभारतात वाईचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये वाई जिंकून मराठा साम्राज्यात समाविष्ट केले व येसाजी मल्हार यांची सुभेदार म्हणून नेमणूक केली. संभाजी महाराजांच्या काळातही वाईचे ऐतिहासिक महत्त्व कायम होते.
१८व्या व १९व्या शतकात वाई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध झाले. येथे अनेक प्राचीन मंदिरे व घाट आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यामुळे वाईला विशेष सांस्कृतिक व बौद्धिक ओळख मिळाली. कृष्णामाई उत्सव हा वाईतील प्रमुख धार्मिक उत्सव आहे.
५. प्राथमिक शाळांची संख्या :
एकूण 163 प्राथमिक शाळा.
६. प्राथमिक आरोग्य केंद्रे / उपकेंद्रे :
प्राथमिक आरोग्य केंद्रे – 4
उपकेंद्रे – 28
७. अंगणवाडींची संख्या :
एकूण 269 अंगणवाड्या.
८. गण / गट संख्या :
गण – 4
जिल्हा परिषद गट – 8
९. जनावरांच्या दवाखान्यांची संख्या :
राज्य स्तरीय – 1
श्रेणी–1 – 3
श्रेणी–2 – 14
एकूण – 18
१०. नगरपालिका / नगरपरिषद :
वाई तालुक्यात वाई ही एकमेव नगरपालिका आहे.
११. नद्या / धरणे / किल्ले :
नदी – कृष्णा
धरणे – धोम, बलकवडी
किल्ले – रायरेश्वर, वैराट, कमळगड
नकाशा- वाई
