बंद

    पं.स सातारा

    १. क्षेत्रफळ :
    876.24 चौ.कि.मी.

    २. लोकसंख्या (पुरुष / महिला) :
    एकूण लोकसंख्या – 5,02,049
    पुरुष – 2,54,028
    महिला – 2,48,021

    ३. तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती :
    कास पठार व ठोसेघर ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. संगम माहुली हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे वेण्णा व कृष्णा या दोन प्रमुख नद्यांचा संगम होतो. चाळकेवाडी येथे पवनऊर्जा प्रकल्प आहे. तसेच तालुक्यात कण्हेर व उरमोडी ही दोन प्रमुख मोठी धरणे आहेत.

    ४. तालुक्याची ऐतिहासिक थोडक्यात माहिती :
    सातारा तालुक्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, समर्थ रामदास स्वामी व कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही कर्मभूमी आहे. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी सज्जनगड येथे असून गुरु ब्रह्मेंद्रस्वामी यांची समाधी धावडशी येथे आहे. श्री रामशास्त्री प्रभुणे यांचे स्मारक क्षेत्र माहुली येथे आहे. अजिंक्यतारा व सज्जनगड हे किल्ले याच तालुक्यात आहेत.

    ५. प्राथमिक शाळांची संख्या :
    जिल्हा परिषद व खाजगी शाळा मिळून एकूण 257 प्राथमिक शाळा.

    ६. प्राथमिक आरोग्य केंद्रे / उपकेंद्रे :
    12 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 47 उपकेंद्रे.

    ७. अंगणवाडींची संख्या :
    एकात्मिक बाल विकास सेवा योजना
    प्रकल्प-1 अंतर्गत – 315 अंगणवाड्या
    प्रकल्प-2 अंतर्गत – 221 अंगणवाड्या
    एकूण – 536 अंगणवाड्या

    ८. गण / गट संख्या :
    एकूण 16 गण व 8 जिल्हा परिषद गट.

    ९. जनावरांचे दवाखाने :
    पशुसंवर्धनासाठी
    श्रेणी–1 चे जनावरांचे दवाखाने – 7
    श्रेणी–2 ची पशुउपचार मदत केंद्रे – 9

    १०. नगरपालिका / नगरपरिषद :
    सातारा तालुक्यात सातारा ही एकमेव नगरपालिका आहे.

    ११. नद्या / धरणे / किल्ले :
    नद्या – कृष्णा, वेण्णा, उरमोडी
    धरणे – कण्हेर, उरमोडी
    किल्ले – अजिंक्यतारा, सज्जनगड

    नकाशा- सातारा

    Satara

     

    गुगल नकाशा दुवा/Google Maps link

     

    सातारा तालुका | जिल्हा परिषद सातारा | भारत