प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
ही योजना दि.१४/१०/२०१६ म्हणजेच सन २०१६-१७ पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. यामध्ये निधीचे प्रमाण केंद्र ६०% व राज्य ४०% हिस्सा असे आहे.
जिल्हास्तरावरील विभागाचे नाव: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा
लाभार्थी प्रवर्ग: आवास प्लस प्रतिक्षा यादी
प्रमुख अटी व शर्ती: Awaas+ प्रतिक्षा यादीत नाव (घर निकषानुसार लाभार्थी कुटुंब घरकुल लाभासाठी पात्र असणे आवश्यक)
लाभार्थी निवड समिती : अध्यक्ष: Hon. CEO, सदस्य- NGO 1,सदस्य सचिव- प्रकल्प संचालक.
अनुदान रक्कम: रुपये 1.20 लक्ष थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा.. तसेच अभिसरण अंतर्गत अ) मनरेगा मधून 90 दिवसाची अकुशल मजुरी (90*297) =26730/-
ब) शौचालय बांधकाम करीता पूर्वीचे अनुदान दिले नसेल तर स्वच्छ भारत मिशन किंवा मनरेगा मधून रुपये 12000/-
असे एकूण रुपये 158730/- एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
लाभार्थी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण लाभार्थी यशोगाथा व्हिडीओ क्लिप
लाभार्थी:
पात्र नागरिक
फायदे:
सर्वांसाठी घरे