बंद

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (२०२५-२०२६)

    ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र/राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतिमानकारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, या स्पर्धेत सर्वेात्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्‍यात येत आहे.
    अभियानाचा कालावधी दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर असा राहील. ग्रामपंचायत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध , स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजिविका व‍िकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे अभियानाचे मुख्य घटक असून अभियान कालावधीत झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकण करून ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. सदर अभियानांतर्गत विविध स्तरांवर एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार आहेत. राज्‍यस्‍तरावर प्रथम क्रमांक विजेत्‍या ग्रामपंचायतीस रु. 5 कोटी, प्रथम क्रमांक विजेत्या पंचायत समितीस रु.2 कोटी व प्रथम क्रमांक विजेत्या जिल्हा परिषदेस रु. 5 कोटी रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. एकूण रु. 245.20 कोटी रकमेचे पुरस्‍कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांमुळे पंचायतींना नवे प्रोत्साहन मिळेल, स्थानिक स्तरावर विकासात्मक योजनांची अंमलबजावणी सर्वंकष पद्धतीने होईल आणि एक निरोगी, स्पर्धात्मक परिसंस्था उभारली जाईल.
    सातारा जिल्हा परिषदेने सदर अभियान राबविताना साप्ताहिक कालबद्ध कार्यक्रम हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत अभियानातील ठराविक निकष ठरवून त्याअनुषंगाने त्या त्या सप्ताहामध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये कार्यवाही करण्याचे उदिष्ट दिले. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर अभियानासाठी शासनाच्या मार्गदर्शनाखाली WAR ROOM ची स्थापना करण्यात आली व त्यांच्या मार्फत अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येत आहे, तसेच जिल्हा परिषद स्तरावरून गावभेटीचा व सभांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

     

    Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan-06112025

     

    अभियान कालावधी शासन निर्णय दि 31122025-3

     

    https://cmsprardd.maharashtra.gov.in/Home/Index