बंद

    एकात्मिक बाल विकास योजना

    परिचय :-

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष सातारा हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना संबंधित विविध कार्यक्रम, व योजना राबविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत 19 प्रकल्पाकडून  ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार योजना राबविल्या जातात.

     

    दृष्टी आणि ध्येय :-        

    ग्रामीण भागातील 3 ते 6 वयोगटातील मुलांना पुर्व प्राथमिक शिक्षण देणे ,माता व बाल मृत्य दर कमी करणे,पुरक पोषण आहार देणे.अंगणवाडीतील  3 ते 6 वयोगटातील मुलांचे कुपोषण कमी करणे,बालकांचा सर्वागींण विकास घडवून आणणे,अंगणवाडी इमारत बांधकाम करणे.

     

    उद्दिष्टे आणि कार्ये :-

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद सातारा विभागामार्फत मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य शासनामार्फत सुरु करणेत आली आहे. तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी सेविका यांना सेवानिवृत्ती,राजीनामा,मृत्यू,सेवासमाप्ती नंतर एक रकमी एलआयसी लाभ दिला जातो. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्फत ग्रामीण भागातील 3 ते 6 वयोगटातील  मुलांना लसीकरण,आरोग्य तपासणी,संदर्भ सेवा,पोषण शिक्षण, सेवा दिल्या जातात.नवीन अंगणवाडीसाठी  इमारत बोधणे व दुरुस्ती करीता डी.पी.सी.नाबार्ड मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो,एकात्मिक बाल विकास विभागामार्फत भरती प्रकिया व बदली प्रकिया राबवली जाते.

     

    प्रशासकीय व्यवस्था

     

    icds pic1

     

                                                                                   कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी

    अ.क्र. नांव  
    1 श्री नागेश ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक)  
    2 श्री आदिल जमादार, विस्तार अधिकारी सांख्यिकी  
    3 श्री सुनिल राक्षे, विस्तार अधिकारी सांख्यिकी  
    4 श्री दत्तात्रय थोरात, वरिष्ठ सहाय्यक  
    5 श्रीमती वैशाली दंघेकर, कनिष्ठ सहाय्यक  
    • एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत्‍ एकूण 19 ग्रामीण बाल विकास प्रकल्प कार्यरत आहेत या व्यवस्थेव्दारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाचे जिल्हयामध्ये कामकाज सुरु असते.

    icds

     

         संचालक/आयुक्तालय

    • एकात्मिक बाल विकास सेवा योजना,नवी मुंबई,

      योजना दस्तऐवज

    महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि- २०22/प्र.क्र.251/का-6 दि.30 ऑक्टोंबर 2023 अन्वये राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करणेत आली . सदरच्या  योजनांचा तपशिल

    गट –अ :- लेक लाडकी योजना

    सदर योजनेची उदिदष्टे खालील प्रमाणे.

    1. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.

    2.मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

    3.मुलींच्या मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.

    4.कुपोषण कमी करणे.

    5.शाळाबाहय मुलींचे प्रमाण 0 (शुन्य)वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

     

    महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि- २०13/प्र.क्र.141/का-6 दि.30 एप्रिल 2014 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचा-यांना एल.आय.सी.योजनेतंर्गत  सेवानिवृत्तीनंतर एकरकमी लाभ देण्याबाबत योजनांचा तपशिल खालीलप्रमाणे

    गट –ब :- एकरकमी एलआयसी

    सदर योजनेची उदिदष्टे खालील प्रमाणे

    1. अंगणवाडी सेविका,मदतनीस व मिनी अंगणववाडी सेविका या मानधनी कर्मचा-यांना सेवानिवृत्ती राजीनामा/मृत्यू सेवेतून काढून टाकल्यानंतर खालील प्रमाणे एल.आय.सी.योजनेतंर्गत एकरकमी लाभ दिनांक 30/04/2014 पासून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत  आहे.

     

    लाभस्तर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका/मदतनीस
    सेवानिवृत्ती रु.1,00,000/- रु.75000/-
    राजीनामा /सेवेतून काढून टाकणे प्रत्येक पुर्ण सेवा केलेल्या एका वर्षासाठी महिन्याचे वेतन(जास्तीत जास्त 1,00,000/-मर्यादेपर्यत) तथापी कमीत कमी पाच वर्षाची सेवा पुर्ण करणे आवश्यक प्रत्येक पुर्ण सेवा केलेल्या एका वर्षासाठी महिन्याचे वेतन(जास्तीत जास्त 75,000/-मर्यादेपर्यत) तथापी कमीत कमी पाच वर्षाची सेवा पुर्ण करणे आवश्यक
    मृत्यू रु.1,00,000/- रु.75000/-

     

    गट –क :- अंगणवाडी बांधकाम

    महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि- २०20/प्र.क्र.131/का-2 दि.31 जानेवारी 2022 अन्वये महिला व बाल विकास सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करणेबाबत. सदरच्या  योजनांचा तपशिल

     

    सदर योजनेची उदिदष्टे खालील प्रमाणे

    1. अंगणवाडी केंद्रांचे नवीन बांधकाम करणे.
    2. अंगणवाडी केंद्रांना नलिकांव्दारे पाणीपुरवठा करणे.
    3. अंगणवाडी केंद्रांना वीज पुरवठा करणे.
    4. अंगणवाडी केंद्रांतील स्वयंपाकघरांचे आधुनिकीकरण करणे.
    5. अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीचे विस्तारीकरण करणे.
    6. अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींची विशेष दुरुस्ती करणे.
    7. अंगणवाडी केंद्रांमध्ये मातांच्या स्वतंत्र प्रतिक्षागृहाचे बांधकाम करणे.
    8. अंगणवाडी केंद्रांकरीता संरक्षक भिंत बांधणे.
    9. वाढ संनियंत्रण संयत्रांचा पुरवठा व देखभालीसाठी खर्च करणे.

    जिल्हयामधील अंगणवाडयांची सदयस्थिती

    अ.क्र. प्रकल्प अंगणवाड्या अंगणवाडी  भरणारी ठिकाणे
    स्वतंत्र इमारत प्रा.शाळा ग्राम पंचायत समाज मंदिर देवालय खाजगी भाडयाची इमारत एकुण
    1 जावली 276 197 29 8 0 0 10 32 276
    2 कोरेगांव 198 180 7 1 2 0 4 4 198
    3 कोरेगांव 2 190 151 13 9 0 0 4 13 190
    4 सातारा 316 246 20 16 0 0 3 31 316
    5 सातारा 2 221 167 14 17 0 1 1 21 221
    6 खंडाळा 190 175 6 3 1 0 2 3 190
    7 म.श्वर 143 109 19 4 0 0 5 6 143
    8 वाई 269 199 28 10 2 0 11 19 269
    9 फलटण 247 207 12 3 0 0 3 22 247
    10 फलटण 2 226 184 13 6 3 0 5 15 226
    11 खटाव 1 227 196 7 0 2 2 0 20 227
    12 खटाव 2 237 204 8 3 2 0 0 20 237
    13 माण 271 197 13 0 1 0 2 58 271
    14 म्हसवड 140 94 17 4 0 1 1 23 140
    15 कराड 304 254 23 2 6 1 0 18 304
    16 कराड 1 222 193 8 3 0 0 1 17 222
    17 कराड-2 156 117 7 5 0 1 2 24 156
    18 पाटण 416 266 48 5 20 4 17 56 416
    19 पाटण 1 313 183 52 12 14 6 14 32 313
    एकूण 4562 3519 344 111 53 16 85 434 4562