अटल बांधकाम कामगार आवास योजना
ही योजना दि. 28.03.2013 पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. यामध्ये निधीचे प्रमाण १००% राज्य हिस्सा आहे.
जिल्हास्तरावरील विभागाचे नाव: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सातारा
लाभार्थी प्रवर्ग: नोंदीत (जिवीत) बांधकाम कामगार
प्रमुख अटी व शर्ती: 1. लाभार्थी कुटुंब बेघर /कच्चे घर
- नोंदीत (जिवीत) बांधकाम कामगार(नोंदणीस 3 वर्ष पूर्ण)
लाभार्थी निवड समिती : अध्यक्ष-अपर कामगार आयुक्त, सदस्य सचिव – उप जिल्हा कार्यकारी अधिकारी
अनुदान रक्कम: रुपये 1.50 लक्ष थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा
अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामपंचायत निहाय लाभार्थी मंजुरी, हप्ते वितरण, पूर्ण अपूर्ण पाहण्यासाठी लिंक: https://awaassoft.nic.in/netiay/AdvanceSearch.aspx
अटल बांधकाम कामगार आवास योजना घरकुल करीता अर्जाचा नमुना
लाभार्थी:
पात्र नागरिक.
फायदे:
पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य/निवास सुविधा.