शबरी आवास योजना
ही योजना दि. 28.03.2013 पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. यामध्ये निधीचे प्रमाण १००% राज्य हिस्सा आहे.
जिल्हास्तरावरील विभागाचे नाव: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,घोडेगाव ता. आंबेगाव
लाभार्थी प्रवर्ग: अनुसूचित जमाती
प्रमुख अटी व शर्ती: 1. लाभार्थी कुटुंब बेघर /कच्चे घर
- संबंधित प्रवर्गाचा जातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी)
- उत्पन्न दाखला- रुपये 1.20 लक्ष च्या मर्यादित (तहसीलदार)
- लाभार्थी निवडीबाबत ग्रामसभा ठराव
- महारष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षे वास्तव्य दाखला
- लाभार्थी कुटुंबाने कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा
7.लाभार्थी कडे स्वतःची जागा अगर शासनाने दिलेली घरकुल बांधकामासाठी पुरेशी जागा आवश्यक
लाभार्थी निवड समिती : अध्यक्ष- मा. अपर आयुक्त,सदस्य सचिव- प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्रकल्प
अनुदान रक्कम: रुपये 1.20 लक्ष थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा.. तसेच अभिसरण अंतर्गत अ) मनरेगा मधून 90 दिवसाची अकुशल मजुरी (90*297) =26730/-
ब) शौचालय बांधकाम करीता पूर्वीचे अनुदान दिले नसेल तर स्वच्छ भारत मिशन किंवा मनरेगा मधून रुपये 12000/-
असे एकूण रुपये 158730/- एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
शबरी आवास योजना ग्रामपंचायत निहाय लाभार्थी मंजुरी, हप्ते वितरण, पूर्ण अपूर्ण पाहण्यासाठी लिंक: https://awaassoft.nic.in/netiay/AdvanceSearch.aspx
शबरी आवास योजना घरकुल करीता अर्जाचा नमुना
शबरी आवास योजना लाभार्थी यशोगाथा व्हिडीओ क्लिप
लाभार्थी:
सामान्य नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे