बंद

    राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजना

    • तारीख : 15/04/2025 -

    राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजना

     

    जिल्हा वार्षिक योजना

    1) एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत तलंगा गट वाटपयोजना

               योजनेचे उद्देश

    कुक्कुटपालन व्यवसायास चालना देणेसाठी लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी

    ( २५ माद्या  + ३ नर ) तलंगा गट वाटप करणे.

    योजनेचे स्वरुप

    1. तलंगा गट २५ माद्या + ३ नर किंमत – रु.४२००/-
    2. खाद्यावरील खर्च – रु.२९४०/-
    3. वाहतूक खर्च – रु.५००/-
    4. औषधी – रु.७००/-
    5. रात्रीचा निवारा –  रु.२०००/-
    6. खाद्याची भांडी –  रु.५००/-

    ———————————————————————————–

    एकूण                                            – रु.१०८४०/-

    महाराष्ट्र शासन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, शासन निर्णय

    क्र.- कुक्कट-२०२२/प्र.क्र.२८/पदुम.दि. २०.०१.२०२३ अन्वये प्रति गटास र.रु.१०८४०/- इतका

    खर्च येणार आहे. त्यापैकी ५० टक्के अनुदान र.रु.५४२०/- व उर्वरित ५० टक्के रक्कम म्हणजेच

    र.रु.५४२०/- लाभार्थीचा स्वहिस्सा राहील. ५० टक्के अनुदान र.रु.५४२० पेकी र.रु.४२०० किंमतीच्या

    तलंगा गट २५ माद्या + ३ नर लाभार्थांना पुरवठा केला जाईल व उर्वरीत अनुदान रक्कम रु.१२२० थेट

    लाभ हस्तांतरण पद्धत्तीने तालुका स्तरावरून लाभार्थ्यांना वर्ग करणेत येते.

    लाभार्थी निवडीचे निकष

    सर्वसाधारण पशुपालक

    • नाविन्यपूर्ण योजना ( SEX SORTED SEMEN )

    योजनेचे उद्देश

    शेतकऱ्याकडील पशुधनाला  पशुधनांच्या sex sorted semen रेतमात्रंद्वारे गर्भधारणा करून 90% मादी

    वा सराची निर्मिती करून जास्तीत जास्त दूध उत्पादन  क्षमता असलेल्या जातीवंत गाई म्हशींची निर्मिती

    करणे.

     

     

    योजनेचे स्वरुप

    सद्यस्थितीत पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत शेतकऱ्यांच्या जनावरांना कृत्रिम रेतनाची सेवा दिली जाते.

    यामध्ये 50% मादी वासरे व 50%नरवासरे जन्माला येतात. यातील नरवासरांचे शेतकरी संगोपन

    करीत नाहीत. परंतु सुरुवातीचे दुधाचे काळामध्ये काही दिवस या नर वासराचा दुधाचा व खाद्याचा खर्च

    शेतकऱ्यांना करावा लागतो. जर आपण लिंग विनिश्चित वीर्यमात्राचा वापर करून जनावरांना कृत्रिम

    रेतन केले तर 90% मादी वासरे जन्माला येतील व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या खर्चामध्ये बचत होईल व

    मादी वासरांचे प्रमाण वाढेल. या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत 90% मादी वासरांची निर्मिती करणे शक्य

    असल्याने यास नाविन्यपूर्ण योजना समजण्यात यावी.

    योजनेची लाभार्थी

    संकरित व देशी पशुपालन पशुधन असलेले सर्व पशुपालक

    अपेक्षित फायदे

    पशुपालकांकडील मादी वासराचे प्रमाण वाढल्याने दूध उत्पादन वाढवून पशुपालकांची आर्थिक

    परिस्थिती सुधारेल.

     

     

     

     विशेष घटक योजना

    1) दुधाळ गट वाटप (०२ दुधाळ जनावरे )

    योजनेचे उद्देश

    अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन

    देणेसाठी विशेष घटक योजने अंतर्गत ०२ दुधाळजनावरे गट वाटप करण्यात येतो.

    योजनेचे स्वरुप

    फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठीदोन गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस)७५ टक्के

    अनुदान देय असून गाई गटासाठी विम्यासह रक्कम रु१,१७,६३८/- व म्हैस गटासाठी रक्कम

    रु१,३४,४४३/-एवढे अनुदान देनेत येते.

    लाभार्थी निवडीचे निकष

    फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थीं

    दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

    अत्यल्प भुधारक शेतकरी

    अल्प भूधारक शेतकरी

    सुशिक्षित बेरोजगार

    महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ),

    ५ टक्के अपंगासाठी

    2) अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना १० +१ शेळी गट वाटप

    योजनेचे उद्देश

    अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन

    देणेसाठी विशेषघटक योजने अंतर्गत १० + १ शेळी गट वाटप करण्यात येतो.

    योजनेचे स्वरुप

    अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी १० + १ शेळी गट वाटप (प्रत्येक लाभार्थीस) ७५ टक्के अनुदान

    विम्यासह र.रु.७७६५९/-देय आहे.

    लाभार्थी निवडीचे निकष

    अनु.जाती व नवबौध्द लाभार्थीं

    दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

    अत्यल्प भुधारक शेतकरी

    अल्प भूधारक शेतकरी

    सुशिक्षित बेरोजगार

    महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (५ टक्के अपंगासाठी)

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ओंनलाईन

    संचिका:

    State Yojana AH (1 MB)