समाज कल्याण विभाग अंतर्गत योजना
सातारा जिल्हा परिषद सातारा
समाज कल्याण विभाग –
जिल्हा परिषद स्वनिधी 5 टक्के सेस व 20 टक्के सेस फंड मधून दिव्यांग लाभार्थी व मागासवर्गीय लाभार्थीं करीता वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी योजना राबविणे.
अर्ज करण्याची कार्यपध्दती :-
सन 2024 पासून जिल्हा परिषद सातारा यांनी जिल्हा परिषद सेस योजना ऑनलाईन पोर्टलव्दारा राबविण्यात येत आहे. सदर योजना अर्ज भरण्याकरीता ….
www.zpsatarascheme.com या संकेतस्थळावरुन लाभार्थ्यास ऑन लाईन पध्दतीने अर्ज उपलब्ध करुन देणेत आले आहेत.
1 जि.प.5 टक्के निधीतून दिव्यांग लाभार्थीना झेरॉक्स मशीन खरेदी अर्थसहाय्य पुरवणे
अटी व शर्ती
1. दिव्यांग लाभार्थी 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अस्थिव्यंग / दिव्यांग प्रवर्गातील असलेबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र./ UDID प्रमाणपत्राची छायांकित प्रत
2. लाभार्थी स्थानिक रहिवासी असलेबाबतचा रहिवासी दाखला.
3. रेशनिंग कार्ड छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत.
4. लाभार्थ्याकडे व्यवसायासाठी कुटुंबाच्या मालकीची जागा असणे आवश्यक.
5. अर्जदार व त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
6. सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लासंधो-2000/ प्रक्र. 57/ 00/कुक 1, दिनांक 01 मे 2000 अन्वये दि. 01 मे 2001 नंतरचे फक्त छोटे कुटुंब (2 जिवंत अपत्य) स्वयंघोषणापत्र
7. लाभार्थ्याची वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे असावी.
8. अर्जदार यांचे बँक खातेवर अनुदान वर्ग करणेसाठी अर्जदार यांचे बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत ज्यावर अर्जदार यांचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड
9. आधारकार्डची सत्यप्रत.
10. दिनांक 23 जूलै 2024 चे बैठकीस अनुसरुन दिव्यांग लाभार्थींना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेसाठी किमान मल्टिफक्शन, ए3, ए4, 24 पीपीएम विवरणाचे झेरॉक्स मशिन प्रति लाभार्थी 50 हजार रुपये अनुदान देणेबाबत मान्यता देणेत आलेली आहे.
2. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळून त्यांचा सामाजिक व आर्थिक उन्नतीस मदत करणे. या योजनेअंतर्गंत लाभार्थ्यांस झेरॉक्स मशिन खरेदीकरीता अर्थसहाय्य पुरविणेत येते.
3. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 73 |
| 2 | 2023-24 | 24 |
| 3 | 2024-25 | 100 |
2. जि.प.5 टक्के निधीतून दिव्यांग लाभार्थीना घरकूल करीता अर्थसहाय्य करणे
अटी व शर्ती
1. दिव्यांग लाभार्थी 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवर्गातील असलेबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/ UDID प्रमाणपत्राची छायांकित प्रत
2. लाभार्थीचे नावे घराचा न नं. 8 अ चा उतारा.
3. लाभार्थी बेघर असलेस लाभार्थीचे नावे मोकळी जागा उपलब्ध असलेबाबत व बेघर असलेबाबतचा उतारा.
4. अर्जदार व त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
5. सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लासंधो-2000/प्रक्र.57/ 00/कुक 1,दिनांक 01 मे 2000 अन्वये दि. 01 मे 2001 नंतरचे फक्त छोटे कुटुंब (2 जिवंत अपत्य) असलेबाबतचा स्वयंघोषणापत्र
6. लाभार्थ्याने पत्त्याच्या पुराव्याकरिता 8 अ उतारा अथवा ग्रामसेवक दाखला जोडावा.
7. अर्जदाराला यापूर्वी सदर योजनेतून अथवा कोणत्याही योजनेतून घरकुल मंजूर झाले नसलेबाबतचा स्वयंघोषणापत्र
8. रेशनिंग कार्ड छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत.
9. अर्जदार यांचे बँक खातेवर अनुदान वर्ग करणेसाठी अर्जदार यांचे बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत ज्यावर अर्जदार यांचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड नमूद असणे आवश्यक.
10. आधारकार्डची सत्यप्रत.
2. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना अथवा बेघर असणा-या दिव्यांग बांधवांना कायम स्वरुपी निवाऱ्याची सोय व्हावी या करीता योजना राबविण्यात येते.
3. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 55 |
| 2 | 2023-24 | 129 |
| 3 | 2024-25 | 81 |
3. जि.प.5 टक्के निधीतून पायाच्या अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांगास तीन चाकी स्कूटरसाठी अनुदान देणेसाठी
अटी व शर्ती
1. दिव्यांग लाभार्थी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पायाचा अस्थिव्यंग प्रवर्गातील असलेबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/ UDID प्रमाणपत्राची छायांकित प्रत
2. अर्जदार व त्याचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
3. लाभार्थी स्थानिक रहिवासी असलेबाबतचा रहिवासी दाखला.
4. अर्जदाराचा वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. परवाना नसलेस जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वाहन चालवणेस पात्र असलेबाबतचे प्रमाणपत्र
5. सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लासंधो-2000/ प्रक्र. 57/ 00/कुक 1, दिनांक 01 मे 2000 अन्वये दि. 01 मे 2001 नंतरचे फक्त छोटे कुटुंब (2 जिवंत अपत्य) असलेबाबतचा लाभ देणेत यावा स्वयंघोषणापत्र
6. लाभार्थी 18 ते 65 वयोगटातील असावा. लाभार्थीचा जन्मतारखेचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. (शाळा सोडलेचा दाखला / जन्म उतारा / बोनाफाईड).
7. निवड झालेल्या लाभार्थ्यास 100 सीसी क्षमतेची स्वयंचलित स्कूटर खरेदी करणे आवश्यक राहील. सदर लाभ घेत असताना तत्पूर्वी राज्य शासन / केंद्र शासन / दानशूर व्यक्ती/ संस्था आदींकडून स्कूटर घेतलेली नसावी.
8. बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत.
9. आधारकार्डची सत्यप्रत.
3. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातीलदिव्यांग व्यक्तींच्या राहते गावापासून त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणा पर्यंतचे अतंर सुरक्षितरित्या पार करता यावे या हेतूने सामाजिक सुरक्षितेतचा भाग म्हणून, पायाने अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी स्कूटर साठी अनुदान उपलब्ध करून देणेच्या हेतूने सदर योजना राबविण्यात येते.
4. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 44 |
| 2 | 2023-24 | 38 |
| 3 | 2024-25 | 31 |
4. दिव्यांग दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना
अटी व शर्ती
1. दिव्यांग लाभार्थी 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/ UDID प्रमाणपत्राची छायांकित प्रत
2. लाभार्थी स्थानिक रहिवासी असलेबाबतचा रहिवासी दाखला.
3. रेशनिंग कार्ड छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत.
4. लाभार्थी प्रति जोडप्यास 50,000/- अनुदान देण्यात येईल
5. लाभार्थ्याची वयोमर्यादा 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त असावे.
6. अर्जदार यांचे बँक खातेवर अनुदान वर्ग करणेसाठी अर्जदार यांचे बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत ज्यावर अर्जदार यांचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड नमूद असणे आवश्यक.
7. लाभार्थीचा विवाह मागील पाच वर्षांत झालेला असावा. विवाहाची नोंद असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
8. विवाहीत जोडपे हे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असणे आवश्यक आहे.
9. आधारकार्डची सत्यप्रत.
2. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातील दिव्यांग- दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक सुरक्षितेतचा भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे याकरीता दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे
3. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 8 |
| 2 | 2023-24 | 7 |
| 3 | 2024-25 | 2 |
5. जि.प.5 टक्के निधीतून अतितीव्र दिव्यांगास निर्वाह भत्ता
अटी व शर्ती
1. अतितीव्र दिव्यांग 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/ UDID प्रमाणपत्राची छायांकित प्रत
2. लाभार्थी स्थानिक रहिवासी असलेबाबतचा रहिवासी दाखला.
3. रेशनिंग कार्ड छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत.
4. लाभार्थी निराधार / निराश्रीत असलेबाबतचा ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला
5. अर्जदार व त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
6. सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लासंधो-2000/ प्रक्र. 57/ 00/कुक 1, दिनांक 01 मे 2000 अन्वये दि. 01 मे 2001 नंतरचे फक्त छोटे कुटुंब (2 जिवंत अपत्य) स्वयंघोषणापत्र असलेबाबतचा लाभ देणेत यावा. (शाळा सोडलेचा दाखला / जन्म उतारा / बोनाफाईड).
7. लाभार्थ्याची वयोमर्यादा 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
8. अर्जदार यांचे बँक खातेवर अनुदान वर्ग करणेसाठी अर्जदार यांचे बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत ज्यावर अर्जदार यांचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड नमूद असणे आवश्यक.
9. आधारकार्डची सत्यप्रत.
2. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातील अतितीव्र दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांची आर्थिक प्रगती होणेच्या उददेशाने सदरची योजना राबविण्यात येते.
3. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 43 |
| 2 | 2023-24 | 31 |
| 3 | 2024-25 | 84 |
6. विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विदयार्थ्यांना लॅपटॉप देणे
अटी व शर्ती
1. दिव्यांग व्यक्तीचा दिव्यांगांत्वाचा प्रकार 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवर्गातील
असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र व UDID छायांकीत प्रत.
2. अर्जदार व त्यांचे एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
3. दिव्यांग व्यक्तीने या योजनेखाली व इतर विभागाकडून सदर प्रकरणी अर्थसहाय्य मिळाले आहे का किंवा समाजकल्याणकडून सदर योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ मिळाला आहे काय याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडण्यात यावा.
4. दिव्यांग लाभार्थी सातारा जिल्हयातील रहिवासी असलेबाबतचा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
5. दिव्यांग लाभार्थी रेशनिंग कार्ड छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत,.
6. आधारकार्डची सत्यप्रत, बँक पासबुक छायांकित प्रत, बॅकेची माहिती मोबाईल क्रमांक आदी
7. लाभार्थी किमान एच.एस.सी. (बारावी) उत्तीर्ण असलेबाबत गुणपत्रिका / बोर्ड सर्टिफिकेट.
8. लाभार्थी 18 ते 25 वयोगटातील असावा. लाभार्थीचा जन्मतारखेचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. (शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला / बोनाफाईड)
9. लाभार्थी विवाहित महिला असल्यास माहेरकडील नाव व सासरकडील नाव ही दोन्ही नावाची व्यक्ती एकच असलेबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला जोडावा.
10. सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक 09 मे 2000 अन्वये लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
11. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड.
13. सदर योजनेअंतर्गत वस्तूचे विवरण 15.6 इंच स्क्रिन, 512 जीबी हार्ड डिस्क, 8 जीबी रॅम, i3, 12 जनरेशन प्रोसेसर असे राहील. यामध्ये प्रति लाभार्थ्यास रु. 36000/- किंवा वस्तू प्रत्यक्ष खरेदीची किंमत यापैकी जी कमी किंमत असेल ते अनुदान अदा करावयाचे निश्चित करण्यात आले आहे. वस्तू खरेदी करुन वस्तू खरेदीची पावती सादर केल्यानंतरच संबंधित निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ देणेत येईल.
2. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातील विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विदयार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात उन्नती होणेच्या उददेशाने सदरची योजना राबविण्यात येते.
3. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 16 |
| 2 | 2023-24 | 10 |
| 3 | 2024-25 | 13 |
राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/तालुकास्तरावर प्राविण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य देणे
अटी व शर्ती
1. दिव्यांग व्यक्तीचा दिव्यांगांत्वाचा प्रकार 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवर्गातील
असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र व UDID छायांकीत प्रत.
2. क्रीडा प्रकार.
3. अर्जदार कोणत्या स्तरावरील खेळाडू आहे, ते नमूद करावे (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय).
4. दिव्यांग व्यक्तीने या योजनेखाली व इतर विभागाकडून सदर प्रकरणी अर्थसहाय्य मिळाले आहे का किंवा समाजकल्याणकडून सदर योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ मिळाला आहे काय याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडण्यात यावा.
5. दिव्यांग लाभार्थी रेशनिंग कार्ड छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत,.
6. आधारकार्डची सत्यप्रत, बँक पासबुक छायांकित प्रत, बॅकेची माहिती मोबाईल क्रमांक आदी
7. दिव्यांग लाभार्थी सातारा जिल्हयातील रहिवासी असलेबाबतचा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
8. अर्जदार व त्यांचे एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
9. ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहनपर अनुदान देणे ही योजना एका आर्थिक वर्षात एकदाच राबविली जाईल.
10. एका खेळाडूचा एका वर्षात एका क्रीडाप्रकारामधील सहभाग विचारात घेतले जाईल व त्यांची सर्वश्रेष्ठ कामगिरी विचारात घेतली जाईल.
11. शालेय खेळामधील खेळाडूंचा यामध्ये समावेश होणार नाही. (उदा. विभागीय स्पर्धा, वसतीगृह स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा)
12. तालुकास्तर— प्रथम क्रमांक रु. 1000/-, द्वितीय क्रमांक रु. 500/-, तृतीय क्रमांक 300/-
13. जिल्हास्तर— प्रथम क्रमांक रु. 1500/-, द्वितीय क्रमांक रु. 1000/-, तृतीय क्रमांक 500/-
14. राज्यस्तर— प्रथम क्रमांक रु. 15000/-, द्वितीय क्रमांक रु. 10000/-, तृतीय क्रमांक 5000/
4. योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार- ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडू साठी त्यांनी राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/तालुकास्तरावर प्राविण्या मिळवलेल्या लाभार्थ्यासाठी आर्थीक मदत होणेच्या उददेशाने सदरची योजना राबविण्यात येते.
•
8. मागील तीन वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2022-23 | 1 |
| 2 | 2023-24 | 8 |
| 3 | 2024-25 | 5 |
20 टक्के जिल्हा परिषद सेस कल्याण कार्यक्रम
1. इयत्ता 5 वी ते 12 वी मागासवर्गीय मुलांना सायकल पुरविणे
अटी व शर्ती
1. लाभार्थी मागासवर्ग प्रवर्गातील असलेबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
2. एकाच कुटुंबातील अनके मुली / मुले जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असले तरी, त्यातील एकच मुलगा / मुलगी यांना योजनेचा लाभ घेता येईल.
3. इयत्ता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असणारा मागासवर्गीय मुलगा / मुलगी यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल, त्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
4. रेशनिंग कार्डची झेरॉक्स / सत्यप्रत जोडावी.
5. अर्जदार व त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
6. बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत.
7. आधारकार्डची सत्यप्रत.
8. सदर योजनेमध्ये योजनेचा लाभ मिळालेनंतर त्याच योजनेकरीता पुन:श्च लाभ घेता येणार नाही.
9. योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्याने किमान विवरणानुसार वस्तू खरेदी करुन वस्तू खरेदीची पावती सादर केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना लाभ देणेत येईल.
10. मागासवर्गीय मुलांना सायकल पुरवणे या योजनेसाठी किमान सीएम सी 26 इंच निकष असलेली सायकल मागासवर्गीय मुले सायकल योजनेसाठी पात्र मुलांना 5850/- (अक्षरी रुपये पाच हजार आठशे पन्नास फक्त) अनुदान देय राहिल.
2 . योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना शाळेच्या ठिकाणी पोहचणेकरिताचा वेळ वाचविणेकरिता ही आर्थिक
सहाय्याची योजना राबविली जाते.
3. मागील वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2024-25 | 44 |
इयत्ता 5 वी ते 12 वी मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविणे
अटी व शर्ती
1. लाभार्थी मागासवर्ग प्रवर्गातील असलेबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
3. एकाच कुटुंबातील अनके मुली जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असले तरी, त्यातील एकच मुलगी यांना योजनेचा लाभ घेता येईल.
4. इयत्ता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असणारा मागासवर्गीय मुलगी यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल, त्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
5. रेशनिंग कार्डची झेरॉक्स / सत्यप्रत जोडावी.
6. अर्जदार व त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
7. बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत.
8. आधारकार्डची सत्यप्रत.
9. सदर योजनेमध्ये योजनेचा लाभ मिळालेनंतर त्याच योजनेकरीता पुन:श्च लाभ घेता येणार नाही.
10. योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्याने किमान विवरणानुसार वस्तू खरेदी करुन वस्तू खरेदीची पावती सादर केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना लाभ देणेत येईल.
11. सन 2025-26 मध्ये 20 टक्के मागासवर्गीय कल्याण जिल्हा परिषद सेस मधील दरनिश्चितीनुसार मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवणे या योजनेसाठी किमान सीएम सी 26 इंच निकष असलेली सायकल मागासवर्गीय मुले सायकल योजनेसाठी पात्र मुलींना 5400/- (अक्षरी रुपये पाच हजार चारशे रुपये फक्त) अनुदान देय राहिल.
2 . योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
ग्रामीण भागातील मागासवर्गीय विदयार्थ्यांनींना शाळेच्या ठिकाणी पोहचणेकरिताचा वेळ वाचविणेकरिता ही आर्थिक सहाय्याची योजना राबविली जाते.
3. मागील वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2024-25 | 34 |
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे
अटी व शर्ती
1. लाभार्थी मागासवर्ग प्रवर्गातील असलेबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
3. लाभार्थीस झेरॉक्स मशीनचा व्यवसाय करणेसाठी जागा उपलब्ध असलेबाबत जागेचा उतारा न. नं. 8 जोडावा.
4. झेरॉक्स मशीनसाठी वीज उपलब्ध असलेबाबत नजीकच्या काळातील लाईट बिलाची झेरॉक्स जोडावी.
5. लाभार्थी गरजू, पात्र व बेरोजगार असलेबाबत तसेच लाभार्थीने सूचित केलेली जागा मध्यवस्तीत असून व्यवसाय करणेस योग्य असलेबाबतचा ग्रामसेवक दाखला जोडणे आवश्यक.
6. रेशनिंग कार्डची झेरॉक्स / सत्यप्रत जोडावी.
7. अर्जदार व त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम रुपये 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला.
8. लाभार्थी 18 ते 50 वयोगटातील असावा. लाभार्थीचा जन्मतारखेचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. (शाळा सोडलेचा दाखला / जन्म उतारा / बोनाफाईड).
9. इयत्ता 10 वी उत्तीर्ण असलेबाबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकीत छायाप्रत जोडावी / 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका.
10. 10 टक्के लाभार्थी हिस्सा भरणेस तयार असलेबाबतचे संमतीपत्रक जोडावे.
11. बँक पासबूकचे प्रथम पानाची साक्षांकीत / झेरॉक्स सत्यप्रत.
12. आधारकार्डची सत्यप्रत.
13. प्रस्तावासोबत सादर केलेल्या सर्व झेरॉक्स प्रती सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
14. सदर योजनेमध्ये योजनेचा लाभ मिळालेनंतर त्याच योजनेकरीता पुन:श्च लाभ न घेता अन्य योजनेतील लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल.
15. मागासवर्गीय लाभार्थींना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेसाठी किमान मल्टिफक्शन, ए 3, ए 4, 24
पीपीएम विवरणाचे झेरॉक्स मशिन प्रति लाभार्थी 50 हजार रुपये अनुदान देणेबाबत मान्यता देणेत आलेली आहे.
16. योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्याने किमान विवरणानुसार वस्तू खरेदी करुन वस्तू खरेदीची पावती सादर केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना लाभ देणेत येईल.
2 . योजनेचा उददेश/लाभाचे स्वरुप/योजनेचा प्रकार-
मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगार मिळून त्यांचा सामाजिक व आर्थिक उन्नतीस मदत करणे. या योजनेअंतर्गंत लाभार्थ्यांस झेरॉक्स मशिन खरेदीकरीता अर्थसहाय्य पुरविणेत येते.
3. मागील वर्षातील लाभार्थी संख्या-
| अ.क्र. | सन | लाभार्थी संख्या-निवड |
| 1 | 2024-25 | 100 |
लाभार्थी:
खालील प्रमाणे
फायदे:
खालील प्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाईन. www.zpsatarascheme.com या संकेतस्थळावरुन लाभार्थ्यास ऑन लाईन पध्दतीने अर्ज उपलब्ध करुन देणेत आले आहेत.