बांधकाम विभाग

बांधकाम विभाग

१) ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करणे (योजने अंतर्गत कामे)

३०५४ मार्ग व पुल (बिगर आदिवासी) या अंतर्गत प्रामुख्याने इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाची कामे घेण्यात येतात. या मध्ये रस्ते सुधारणा/अस्तिवातील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण इत्यादी कामे करण्यात येतात.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सातारा जिल्हयाचे रस्ते विकास योजनेनुसार एकुण ८६५९.५४० कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. तसेच देखभाल व दुरूस्तीसाठी एकुण ७३ इमारती आहेत. ज्यामध्ये निवासी इमारती ७३ व अनिवासी इमारती आहेत.

२) योजनेतर रस्ते विशेष दुरूस्ती करणे कार्यक्रम व वार्षिक दुरूस्ती करणे

अस्तिवातील जिल्हा परिषद मालकीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जा असलेले व रस्ते आराखडे मध्ये सामाविष्ट असलेल्या रस्त्याची खालील प्रमाणे दुरूस्ती करणेची कामे केली जातात.

  • खडी व डांबराने ख़ड्डे भरणे
  • पाण्याचा निचरा होणेसाठी गटर्स बांधणे
  • पाणी वाहून जाण्यासाठु योग्य ठिकाणी सिमेंट पाईप टाकणे व पाणी वाहून जाणेसाठी योग्य दिशेने गटर्स काढणे
  • अति पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरूस्त केली जातात.

३) मा.खासदार/मा.आमदार निधी अंतर्गत करण्यात येणारी कामे

प्रामुख्याने मा.आमदार/खासदार/यांचेकडून आवश्यकतेनुसार व तातडीची कामे घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने रस्ते/शाळागृह/समाज मंदिर /व्यायाम शाळा इत्यादी कामे मंजूर केली जातात

४) तिर्थक्षेत्र विकास योजना ( ब वर्ग, क वर्ग)

जिल्हयातील तिर्थक्षेत्राना मा.जिल्हा नियोजन समितीमार्फत क वर्गीय तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येते. याचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी आवश्यक सुख सुविधा (उदा.शौचालय /स्वच्छता गृह/भक्त निवास/वाहनतळ/पाणीपुरवठा/पथदिवे/संरक्षक भित) इ.कामे घेतली जातात.प्रकल्प आराखड्यानुसार कामे हाती घेण्यात येतात. ब वर्ग तिर्थक्षेत्र घोषित झाल्यावर दरवर्षी एक लाख भाविक दर्शनास येत असलेबाबतचा प्रांताधिकारी/पोलिस निरीक्षक यांचा दाखला आवश्यक आहे.

५) उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ

या योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय/संरक्षक भित/दशक्रिया घाट/प्रशिक्षण केंद्र इमारत/नविन रस्ता/पाणी पुरवठ्याची पुरक कामे घेतली जातात.

६) २५१५ शासकिय योजना लोकप्रतिनीधींनी सुचविलेली कामे

या योजनेतून सामाजिक सभागृह, रस्ते दशक्रिया घाट, स्मशान भूमी व इतर विविध कामे मंजूर केली जातात.

७) जिल्हा परिषद/पंचायत समिती नविन प्रशासकीय इमारती, निवासस्थाने बांधकामे

पंचायत समिती नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकामे व पदाधिकारी/अधिकारी कर्मचार्‍यांसाठी निवास स्थान बांधकाम करण्यात येतात.

८) वित्त आयोग

लेखाशिर्षातून तीन स्तरावर अनुदान वाटप अर्थविभागातून होते.
१. ग्रामपंचायत स्तर
२.पंचायत समिती स्तर
३.जिल्हा परिषद स्तर

९) जिल्हा परिषद निधीतील विविध कामे

१. इमारतीचे मुळ कामे (सामाजिक सभागृह, सांस्कृतिक केंद्र/कर्मचारी व अधिकारी निवासस्थान)
२. इमारत दु्रूस्ती व देखभाल (जिल्हा परिषद/पंचायत समिती मालकीच्या इमारतींची दुरूस्ती)
३. रस्ते विशेष दुरूस्ती (अस्तिवातील जिल्हा परिषद मालकीचे रस्ते दुरूस्ती)
४. विविध विकास कामे(नविन इमारती/संरक्षण भिंत/रस्ते)
५. विश्रामगृह दुरूस्ती(जिल्हा परिषद मालकीचे)

यामध्ये साधारण रस्ते/एस.टी थांबे/समाज मदिर/व्यायाम शाळा/सभा मंडप व नविन किरकोळ लांबीचे रस्ते व अस्तिवातील रस्त्यांची विशेष दुरूस्ती करणे आदी कामे केली जातात.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तर व दक्षिण अंतर्गत येणारे तालुके व उपविभाग खालीलप्रमाणे

अ. क्र. तालुकें उपविभागांचे मुख्यालय
1 सातारा सातारा
2 वाई वाई
3 कोरेगांव कोरेगांव
4 खंडाळा खंडाळा
5 फलटण फलटण
6 महाबळेश्वर महाबळेश्वर
7 खटाव खटाव
8 माण माण
9 जावली जावली
10 कराड कराड
11 पाटण पाटण

ग्रामिण रस्तें विकास व मजबुतीकरण करणे (योजने अंतर्गत कामे )

  • ३०५४ मार्ग व पुल(बिगर आदिवासी)या योजनेअंतर्गत प्रामुख्यांने इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्गाची कामे घेणेत यतात या मध्ये रस्ता सुधारणा/ अस्तीत्वातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण इत्यादी काम करणेत येतात
  • १) रस्ता सुधारणा २)नवीन रस्त्याची बांधकामे ३) पुलांची व जलनिस्सारणाची कामे ४)मजबुतीकरण ५) डांबरीकरण इत्यादी कामे केली जातात
  • जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत आरोग्य विभागाकडील ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत असुन त्यापैकी ६९ प्राथमिक आरोग्य केंद्रानां स्वतःच्या इमारती आहेत.३ प्रा आ केंद्राना स्वताची इमारती नाहीत .तसेच १३ प्रा आ केंद्राची बांधकामे सुरु आहेत त्याचप्रमाणे या विभागांच्या अखत्यारित ४०० उफद्र कार्यरत असुन 3७५ उफद्रांना स्वताच्या इमारती आहेत व २५ उफद्रांना स्वताच्या इमारती नाहीत तसेच १३ उफद्राच्या इमारतीची बांधकामे सुरु आहेत

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मार्फत शासन हस्तांतरित योजना जिल्हा परिषदेच्या वैधानिक जबाबदारी अंतर्गत योजना व इतर विभागांची योजना अंतर्गत व योजनेत्तर कामाचा मिळून एकूण ४० लेखा शिर्षका अंतर्गत कामे करण्यात येतात. आर्थिक वर्ष २०१8-१9 मधील या सर्व लेखा शिर्षाचा मिळून रुपये १०८८२ कोटींचा जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागाचा कार्यभार आहे.

पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे कोरेगांव येथील कामास शासनांने मान्यता दिलेली आहे या योजनेतून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, उफद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने बांधली जातात. या कामांना आरोग्य व पशुसंवर्धन विभागाकडून अनुदान उपलब्ध होते.

वित्त विभाग

लेखा शिर्षातून खालील प्रमाणे तीन स्तरावर अनुदान वाटप अर्थ विभागाकडून होते.

  • ग्रामपंचायतस्तर
  • पंचायत समितीस्तर
  • जिल्हा परिषदस्तर
  • १३ वा वित्त आयोग योजना अंतर्गत शासन स्तरावर रस्ते दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध होते

जिल्हा परिषद निधीतील विविध विकास कामे

  • इमारतीची मूळ कामे (सामाजिक सभागृह, सांस्कृतिक केंद्र, कर्मचारी व अधिकारी निवासस्थान)
  • इमारत देखभाल व दुरुस्ती(जिल्हा परिषद/पंचायत समिती मालकीच्या इमारतीची दुरुस्ती)
  • रस्ते विशेष दुरुस्ती (अस्तित्वातील जिल्हा परिषद मालकीचे रस्ते दुरुस्ती)
  • विविध विकास कामे (नवीन इमारती/संरक्षण भित/रस्ते)
  • विश्रामगृह दुरुस्ती (जिल्हा परिषद मालकीचे )

यामध्ये साधारण रस्ते/ एस.टी.थांबेल/समाजमंदीर/व्यायामशाळा/सभामंडप व नवीन किरकोळ लांबीचे रस्ते व अस्तित्वातील रस्त्यांची विशेष दुरुस्ती करणे आदी कामे केली जातात.

योजनेत्तर रस्ते विशेष दुरुस्ती करणे कार्यक्रम व वार्षिक दुरुस्ती करणे अस्तित्वातील जिल्हा परिषदे मालकीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जा असलेले व (१९८१-२००१) रस्ते विकास आराखडयामध्ये समाविष्ठ असलेल्या रस्त्याची खालील प्रमाणे दुरुस्ती करणेची कामे केली जातात.

  • खडी व डांबराने खड्डे भरणे.
  • पाण्याचा निचरा होणेसाठी गटर्स बांधणे.
  • पाणी वाहून जाणेसाठी योग्य ठिकाणी सिमेंट पाईप टाकणे व पाणी वाहून जाणेसाठी योग्य दिशेने गटर्स काढणे.
  • अतिपावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त केले जातात.
  • मा. खासदार/मा.आमदार निधी अंतर्गत करणेत येणारी कामे. प्रामुख्याने मा.आमदार/मा.खासदार यांचेकडून आवश्यकतेनुसार व तांतडीची कामे केली जातात. यामध्ये प्रामुख्याने रस्ते शाळागृहे, समाजमंदीरे, व्यायामशाळा इ. कामे मंजूर केली जातात.

तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम (ब वर्ग व क वर्ग)

जिल्हयातील तिर्थक्षेत्राना मा जिल्हा नियोजन समितीमार्फत (डी पी डी सी) क वर्गीय तिर्थक्षेत्र म्हणुन मान्यता देणेत येते याचा आराखडा तयार करुन त्याठीकाणी आवश्यक त्या नागरी सुखसुविधा(उदा शचालय/ स्वच्छतागृह ग हे/ भक्तनिवास/ वांहनतळ/पाणीपुरवठा/पथदिवे/ सरक्षक भित) इत्यादी कामे घेतली जातात प्रकल्प आराखडयानुसार कामे हाती घेणेत येतात जिल्हयात आज अखेर तिर्थक्षेत्राना शासनाने ब वर्गीयतिर्थक्षेत्र घोषित केलेले आहे त्याचप्रमाणे सज्जनगड,ता सातारा,जरंडेश्वर ता कोरेगांव ही यात्रास्थळे ब वर्ग यात्रास्थळ म्हणुन घोषित केलेली आहेत ब वर्ग तिर्थ क्षेत्र घोषित झालेनंतर दरवर्षी एक लाख भाविक दर्शनासाठी येत असलेबाबतची प्रातांधिकारी/ पोलीस निरिक्षक यांचा दाखला आवश्यक असतो व त्या ठीकांणी नागरी सुविधांची कामे करणेकरिता जिल्हापरिषदेच्या नावांने जागा बक्षिसपत्राने देणे आवयश्यक आहे

उर्वरित महाराष्ट वैधानिक विकास मंडळ

या योजनेमधुन ग्रामपंचायत कार्यालय/ संरक्षकभित/ दशक्रीया घाट/ प्रशिक्षण केंद्र इमारत/ नवीनरस्ता/ पाणीपुरवठयाची पुरक कामे घेतली जातात .

शासकिय योजना लोकप्रतिनिधीनी सुचविलेली कामे
या योजनेतुन सामाजिक सभागृह रस्ते दशक्रीया घाट स्मशानभुमी व इतर विविध काम मंजुर केली जातात

जिल्हापरिषद पंचायत समिती नवीन प्रशासकिय इमारती निवासस्थाने बांधकामे
पंचायत समिती नवीन प्रशासकिय इमारतीचे बांधकामे व पदाधिकारी/ अधिकारी कर्मचारी यांचेसाठी निवासस्थाने बांधली जातात महाबळेश्वर पंचायत समिती नवीन प्रशासकिय इमारतीचे काम मंजुर झालेले असुन फलटण पंचायत समितीचे काम प्रगतीपथावर आहे.