लघुपाटबंधारे विभाग

लघुपाटबंधारे विभाग

प्रस्तावना

आपल्या देशामध्ये ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतकर्‍यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे स्वरुपाची ० ते १०० हेक्टर्स मधील कामे अल्प कालावधीत पुर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतकर्‍यांना होत असतो. यामध्ये सामान्यपणे पाझर तलाव, ग्राम तलाव, को.प.बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात.

अशा ० ते १०० हेक्टर सिचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध लेखाशिर्षाअंतर्गत राबविली जातात. यासाठी सातारा जिल्हा परिषदेकडे लघु पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत ११ तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे लघु पाटबंधारे उपविभाग सातारा, खटाव, फलटण, कराड व जिल्हा परिषद निर्मित खंडाळा अशा पाच व ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग कोरेगाव व वाई व जवळी या तीन उपविभागामार्फत केली जातात.

या विभागाकडून करण्यात येणार्‍या विविध कामांची माहिती

पाझर तलाव/ग्राम तलाव

पाणी पाझरण्यासाठी उपयुक्त असलेल्या भुस्तरीय स्थळावर नाला पाहून मातीचा बंधारा बांधून त्यामध्ये पावसाळयात पाणी साठवण्यात येते. अशा प्रकारे साठविलेले पाणी पाझरून तलावाच्या खालील भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढते. तसेच पाझर तलावाखालील भूजलाची पातळी वाढविणेस या तलावांचा उपयोग होतेा. या तलावापासून होणारे सिचन हे अप्रत्यक्ष स्वरुपाचे सिचन असते. तलावातील उपलब्ध पाण्याच्या उपयोग मत्स्यव्यवसायासाठी ही करता येतो.

कोल्हापुर पध्दतीचे बंधारे

नदी किवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी दगडी बंाध व झडपाद्धारे (फळया टाकून) अडविले जाते. यास केाल्हापूर पंध्दतीचे बंधारे असे म्हणतात. या मधून उपसा पध्दतीने शेतकरी शेतीला पाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी को.प.बंधार्‍याचे वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून को.प.बंधार्‍यामध्ये पाणी अडवून सिचन केले जाते.

वळण बंधारे

सदरचे बंधारे हे सतत वाहत्या ओढयावर या पध्दतीने बांधण्यात येतात की, वाहणारे पाणी झडपाद्धारेअडवून ठेवण्यात येते व पाटाद्धारे ते पाणी लाभ क्षेत्रातील शेतीस सिचनासाठी वापरण्यात येते. या बंधारेद्धारे प्रत्यक्ष सिचन केले जाते व सदरचे बंधारे हे जेथे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणीच बांधण्यात येतात.

या विभागाकडील विविध लेखाशिर्षाखालील माहिती

जिल्हा वार्षिक योजना

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ५ ल.पा.सामान्य कामे व ५ ल.पा. को.प.बंधारे या लेखाशिर्षा अंतर्गत या विभागाकडे एकुण १४९ कामे होती. त्यापैकी ११५ कामे पुर्ण झालेली असून २ कामे रद्द करण्यात आले. उर्वरीत ३२ कामे प्रगतीपथावर आहेत व दोन्ही लेखाशिर्षाखाली रक्कम रुपये १४४३.३२ लक्ष ऐवढे अनुदान खर्च करण्यात आलेला आहे.

जलयुक्त शिवार

सन २०४१५-१६ मधील जलयुक्त शशवार अशभयान योजनेमधील ९५ कामे होती त्यापैकी सन२०१६-१७ मध्ये ९३ कामे पूणस झाली व २ कामे रद्द करणेत आली व या कामावर एकूण रक्कम रुपये ६१८.४६ लक्ष इतका खर्च झालेला आहे.

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडण्यात आलेल्या २१० गांवापैकी या विभागाकडे जलयुक्त शिवार लेखाशीर्षाअंतर्गत एकुण २१९ कामे हाती घेण्यात आलेले आहेत त्यापैकी ९९ कामे पूर्ण झालेली आहेत त्यावर दिनांक ३०/०६/२०१७ अखेर ७६९.४९ लक्ष इतका निधी खर्च करणेत आलेला आहे. उर्वरित १२० कामापैकी ६९ कामे प्रगतीपथावर असून ४८ कामे निविदा कार्यवाहीत आहेत व ३ कामे रद्द प्रस्ताववत आहेत.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदस्तरावर मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा यांचे अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती स्थापन केली असून सदर समितीमध्ये मा. उपाध्यक्ष जि.प.सातारा, मा. सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प.सातारा, मा. सभापती, शेती व पशुसवर्धन, जि.प.सातारा व सभापती, महिला व बालकल्याण समिती, व सभापती, समाजकल्याण समिती हे पदसिध्द सदस्य असतात व अन्य आठ जिल्हा परिषद,सदस्य हे सभासद आहेत. त्याच प्रमाणे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि.प.सातारा, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.सातारा व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग हे देखिल या समितीचे सदस्य आहेत. मा. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

मा. श्री. संजीव विजयसिंह नाईक निंबाळकर,
अध्यक्ष जि प सातारा
अध्यक्ष
मा. श्री. वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे,
उपाध्यक्ष जि प सातारा
पदसिध्द सदस्य
मा. श्री. राजेश वसंत पवार,
सभापती, शिक्षण व अर्थ समिती जि प सातारा
पदसिध्द सदस्य
मा. श्री. मनोज जयवंत पवार,
सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती
पदसिध्द सदस्य
मा. श्री. शिवाजी दादा सर्वगोड,
सभापती, समाजकल्याण समिती
पदसिध्द सदस्य
मा. सौ. वनिता नारायण गोरे,
सभापती, महिला व बाल कल्याण समिती
पदसिध्द सदस्य
मा. श्री. निवास आत्माराम थोरात, सदस्य
मा. सौ. सोनाली मनोजकुमार पोळ सदस्या
मा श्री सुरेंद्र मोहनराव गुदगे सदस्य
मा. श्री उदयसिंह विलासराव पाटील सदस्य
मा. सौ. सुनिता विजय कचरे सदस्या
मा. सौ.अर्चना राहूल देशमुख सदस्या
मा. श्री. प्रल्हाद मारुती भिलारे निमंत्रित सदस्य
मा. शिवाजीराव आनंदराव महाडीक निमंत्रित सदस्य
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प सातारा पदसिध्द सदस्य
मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प सातारा पदसिध्द सदस्य सचिव
मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), जि प सातारा पदसिध्द सदस्य
मा. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पूरवठा विभाग, जि प सातारा पदसिध्द सदस्य
मा. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि प सातारा पदसिध्द सदस्य