महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभाग

एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष

प्रस्तावना

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही देशात 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरु झाली. सातारा जिल्ह्यात 1985 पासून योजना कार्यान्वित असून, सध्या सर्व 11 तालुक्यात 18 प्रकल्पाद्वारे 4799 अंगणवाड्यांमधून योजनेच्या सेवा लाभार्थींना दिल्या जातात.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश्य

 • ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे.
 • बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
 • अर्भक मृत्यू , बालमत्यू, कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे.
 • बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे.
 • योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे.

एबाविसे योजने अंतर्गत देण्यात येणा-या सेवांची माहिती

 • पूरक पोषण आहार
 • आरोग्य तपासणी
 • लसीकरण
 • संदर्भ सेवा
 • अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण
 • आरोग्य व पोषण शिक्षण

एबाविसे योजने अंतर्गत लाभ देण्यात येणारे लाभार्थी

 • ० ते ६ महिने वयोगटातील बालके
 • ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके
 • ३ वर्ष ते ६ वर्ष वयोगटातील बालके
 • गर्भवती व स्तनदा माता
 • किशोरवयीन मुली
 • १५- ४५ वयोगटातील अन्य महिला

लाभार्थी निहाय देण्यात येणा-या सेवांची माहिती

अ.क्र लाभार्थी प्रकार देण्यात येणारी सेवा
1 0 ते 6 महिने वयोगटातील बालके 1. लसीकरण
2. पूरक पोषण आहार.
3. आरोग्य तपासणी
4. संदर्भ सेवा
2 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके 1. पूरक पोषण आहार.
2. लसीकरण
3. आरोग्य तपासणी
4. संदर्भ सेवा
3 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालके 1. पूरक पोषण आहार.
2. लसीकरण
3. आरोग्य तपासणी
4. संदर्भ सेवा
5. अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण
4 गर्भवती व स्तनदा माता 1. आरोग्य तपासणी
2. लसीकरण
3. संदर्भ सेवा
4. पूरक पोषण आहार
5. पोषण व आरोग्य शिक्षण
5 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुली 1. पोषण व आरोग्य शिक्षण
2. अनौपचारिक शिक्षण
3. पूरक पोषण आहार
6 15 ते 45 वयोगटातील अन्य महिला 1. पोषण व आरोग्य शिक्षण

प्रकल्प निहाय कार्यरत अंगणवाड्या

सातारा जिल्ह्यात सध्या ३९३० मोठ्या व ८६९ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत.

अ.क्र प्रकल्प कार्यरत अंगणवाडी संख्या
मोठ्या मिनी
1 जावली 228 57
2 कोरेगाव 210 18
3 कोरेगाव 2 168 22
4 सातारा 304 32
5 सातारा 2 217 40
6 खंडाळा 203 22
7 म.श्वर 112 31
8 वाई 239 30
9 फलटण 207 40
10 फलटण 2 203 23
11 खटाव 201 50
12 खटाव 2 186 51
13 माण 207 96
14 म्हसवड 112 28
15 कराड 356 43
16 कराड 1 284 32
17 पाटण 278 138
18 पाटण 2 215 116
एकूण 3930 869

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजना

पूरक पोषण आहार

पूरक पोषण आहार योजने अंतर्गत 6 म. ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरी मुली यांना लाभ देण्यात येतो. पैकी 6 म. ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरी मुली यांना स्थानिक स्तरावर बचत गटांमार्फत उत्पादित घरपोच आहार (Take Home Ration - THR) देण्यात येतो. 3 व. ते 6 व. वयोगटातील बालकांना अंगणवाडी मध्ये बचत गटाने तयार केलेला गरम ताजा आहार देण्यात येतो.

ग्राम बाल विकास केंद्र (VCDC)

 • ग्राम बाल विकास केंद्र हे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकां व आरोग्य विभागामार्फत घेण्यात येते. सदर केंद्रामध्ये आहार व आरोग्य सेवा दिल्या जातात.
 • ग्राम बाल विकास केंद्राचा कालावधी 4 आठवडे ते 12 आठवडयाचा असतो. त्यानंतर ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दाखल बालकांच्या वृद्धीसनियंत्रणाचा पाठपुरावा अंगणवाडी सेविकांमार्फत 6 महिन्यापर्यंत केला जातो.
 • ग्राम बाल विकास केंद्रामध्ये ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सॅम व मॅम श्रेणीतील बालकांना 4 आठवडे ते 12 आठवड्यापर्यंत दाखल करण्यात येते.
 • ग्राम बाल विकास केंद्रामध्ये सदर बालकांच्या मातांना आरोग्य व पोषण प्रशिक्षण दिले जाते.
 • सदर ग्राम बाल विकास केंद्रे सॅम बालकांकरिता शासनाच्या निधी आणि मॅम बालकांकरिता लोकसहभागातून चालविली जात आहेत.

अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्ती

 • अंगणवाडी इमारत बांधकामाकरीता डी.पी.सी, नाबार्ड मार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो.
 • फेब्रुवारी 2022 पासून अंगणवाडी इमारत बांधकामासाठी खर्चाची मर्यादा र.रू. 11.25 लाख प्रति अंगणवाडी याप्रमाणे करण्यात आलेली आहे.

सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना

उददेश

 • मुलींचा जन्मदर वाढविणे
 • लिंग निवडीस प्रतिबंध करणे
 • मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे
 • बालविवाहास प्रतिबंध करणे
 • मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे

योजना पात्रतेचे निकष

 • 1 ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली
 • बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
 • मातेने/पित्याने कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला
 • लाभार्थ्याचे आई/वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी दाखला
 • वार्षिक रु.8.00 लाखापर्यंत उत्पन्न असलेले पालक. (तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक)
 • शिधापत्रिका,लाभार्थी मुलीचे आधारकार्ड,लाभार्थी मुलीचे लसीकरण कार्ड
 • सदरची योजना बँक ऑफ महाराष्ट्र यांचे मार्फत राबविली जाणार असल्याने, लाभार्थी व आई यांचे संयुक्‍त खाते उघडणे आवश्यक आहे.

योजनेचे स्वरुप

 • एका मुलीच्या जन्मानंतर मातेने/पित्याने दोन वर्षांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन अर्ज केल्यास, त्या मुलीच्या नावे रु 50000/- बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतील.
 • दोन मुलीच्या जन्मानंतर मातेने/पित्याने एक वर्षांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन अर्ज केल्यास, प्रति मुलगी रु 25000/- इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतील.
 • मुलीला वयाच्या 18 व्या वर्षी मुददल व व्याज मिळेल, तसेच मुलीच्या वयाच्या 6 व्या व 12 व्या वर्षी ठेवीवरील अनुज्ञेय होणारे फक्त व्याज काढता येईल.
 • योजनेच्या लाभाची रक्‍कम मिळणेसाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे व इयत्ता दहावी पास/नापास तसेच मुलीचे वय वर्षे 18 चे आत लग्न झालेले नसावे.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीत प्राप्त अनुदान रक्‍कम रु 143.50 लक्ष मधून 559 लाभार्थीना मुदत ठेवीदवारे लाभ देण्यात आला.

बेटी बचाओ बेटी पढाओ

बेटी बचाओ बेटी पढाओ हा मा.पंतप्रधान यांचा फलॅगशीप कार्यक्रम असून, या योजनेचा शुभारंभ दि. 22 जानेवारी 2015 रोजी मा.पंतप्रधान यांच्या शुभहस्ते पानिपत हरियाणा येथे करणेत आला.

कार्यक्रमाचा उददेश

 • गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणे.
 • मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे.
 • मुलींच्या आस्तित्वाचे व जीविताचे सरंक्षण करणे.
 • मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे व शिक्षणातील सहभाग वाढविणे.
 • मुलींची शाळेतील गळती रोखणे.

सन 2018-19 या आर्थिक वर्षात सातारा जिल्हयाचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हयामध्ये खालील उपक्रम घेण्यात येत आहेत.

 • मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रीक्ट टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर ब्लॉक लेवल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
 • सदर कार्यक्रमास वृत्तपत्र, रेडीओ, पथनाटय, मेळावे, बैठका, विशेष ग्रामसभा व महिला ग्रामसभा, स्त्री जन्माचे स्वागत, नवदांपत्य व कुटूंबांचे समुपदेशन इत्यादी माध्यमादवारे व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देवून व जनजागृती करुन, लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत सन 2018-19 ते सन 2020-21 या कालावधीत दरवर्षी प्राप्त अनुदान रक्‍कम रु 25 लक्षमधून योजनेची प्रचार व प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.