शिक्षण (माध्यमिक) विभाग

शिक्षण (माध्यमिक) विभाग

शिक्षण (माध्यमिक) विभाग 2023 :- पाहण्यासाठी क्लिक करा

माध्यमिक विभागाकडील शासकीय/जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी वर्ग मंजूर आहे.

शासकीय

अ.क्र. संवर्ग मंजूर भरलेली रिक्तपदे
शिक्षणाधिकारी
उपशिक्षणाधिकारी
अधिक्षक
विज्ञान पर्यवेक्षक
सहा.शिक्षण उप निरिक्षक
वरिष्ठ सहाय्यक
वाहन चालक.

जिल्हा परिषद

अ.क्र. संवर्ग मंजूर भरलेली रिक्तपदे
कक्ष अधि. तथा सहा.प्रशा.अधि.
कनिष्ठ प्रशासन अधिकारी
शिक्षण विस्तार अधिकारी
वरिष्ठ सहाय्यक
कनिष्ठ सहाय्यक
कनि.सहा.लेखा
लघुटंकलेखक
शिपाई

सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक विभागाकडे माध्यमिक शाळांची संख्या खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित स्वयं अर्थ सहाय्यित शाळा एकुण
मराठी ५२५ ५६ २२ ६०३
इंग्रजी ७५ ७६
उर्दु
आश्रमशाळा १४ १९
पब्लिक स्कूल
केंद्रीय शाळा
नगरपालिका
जि.प.
नवोदय विद्यालय
एकुण एकंदर ५४९ ६२ ७५ २२ ७०८

जि.प.सातारा तालुका माध्यमिक शाळा संस्था

अ.क्र. तालुका अनुदानित शाळा अंशतः अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा कायम विना अनुदानित एकुण
जावली २२ २६
कराड ८७ १०५
खंडाळा २४ २९
खटाव ५५ ६१
कोरेगांव ५० ५५
महाबळेश्वर १६ २७ ४३
माण ५२ ६१
पाटण ५४ ६२
फलटण ६० ६६
१० सातारा ७३ १७ १००
११ वाई ३३ ३९
एकुण ५२६ ३० २७ ६४ ६४७
ज्युनि. कॉलेज ११३
डि. एड. कॉलेज
सराव पाठशाळा
एकुण १२४

श्री.रामकृष्ण विद्यामंदीर नागठाणे येथे दि.११ ते १४ ऑगस्ट २०१४ मध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातून राज्य स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी.

अ.क्र. उपकरणाचे नाव शाळेचे नाव विद्यार्थ्याचे नाव
लाईफ जॅकेट बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे, ता.वाई श्रध्दा मदन शेडगे
बहुउद्देशिय स्टोव्ह श्रीमंत गाडगेमहाराज माध्य.आश्रमशाळा गोंदवले ता.माण युवराज बाळू शिगटे
एस.डी.सायकल न्यू इरा हायस्कूल, पाचगणी ता.मश्वर सनद सुनिल पिसे
इंडो इस्त्राईल शेती जि.प.शाळा शेंदुरजणे ता.वाई अथर्व भरत देवकर
गिरणीतून धान्य सरकवण्याचे यंत्र जि.प.प्राथ.शाळा काळंगेवाडी ता.वाई निकिता प्रताप कदम

या विभागामार्फत खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.

१) ज्यांचे किवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १०००००/-पेक्षा जादा नाही अशा विद्यार्थ्यांना फी माफी

सदरच्या योजनेअंतर्गत संबंधित विद्यालये/महाविद्यालये विद्यार्थ्याकडून मा सरपंच ग्रामपंचायत, नगरसेवक/ नगराध्यक्ष नगरपालीका यांच्या स्वाक्षरीचे उत्पन्नाचे दाखले विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन संपूर्ण शाळेच्या एकत्रिक प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करुन मंजूरी प्राप्त करुन घेतात. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.११०००००/- तरतूद करण्यात आली असुन लाभार्थी १०३५४ लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे.सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे.

२) इ. १२ पर्यतच्या मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता १२ वी पर्यतच्या मुलींना मोफत शिक्षणाची सवलत या योजनेअंतर्गत दिली जाते. सबंधित मुलींची केवळ प्रतिज्ञापत्र महाविदयालयाकडून प्राप्त करुन घेऊन दप्तरी जतन करुन ठेवली जातात.सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.११०००००/- तरतूद करण्यात आली असुन त्याचा १६१५४ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे

३) प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या पहिल्या तीन अपत्यांना सदरची शैक्षणिक सवलत अनुज्ञेय असते. सबंधित अर्जदार यांचे शिधा पत्रिकेवरुन अपत्यांची खात्री करुन शाळेमार्फत प्रस्ताव सादर केलेनंतर सदरची मंजूरी कार्यालयाकडून दिली जाते. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.५१००००/- तरतूद करण्यात आली असुन त्याचा ४४८ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे.

४) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पाल्यांना पदव्यूत्तर स्तरापर्यत मोफत शिक्षण

सदर कर्मचा-यांच्या प्रथम दोन अपत्यांनाच सदरची शैक्षणिक सवलत अनुज्ञेय असते. सबंधित अर्जदार यांचे शिधा पत्रिकेवरुन अपत्यांची खात्री करुन शाळेमार्फत प्राप्त प्रस्तावांना मंजूरी देवून सदरच्या लाभाचे वितरण केले जाते. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.५६००००/- तरतूद करण्यात आली असुन त्याचा ३५० लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे.

५) आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना द्यावयाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

सदरची योजनेअंतर्गत मा. शिक्षण संचालनालयाकडून कला, वाणिज्य, शास्त्र या शाखानिहाय अनुक्रमे १६, ३२, ८० या मंजूर संच मर्यादेपर्यत लाभार्थ्यींचे टक्केवारीचे अग्रक्रमानुसार मंजूरी दिली जाते. सदर योजनेससाठी पालकांचे वार्षीक उत्पन्न तहसिलदार यांचकडील दाखला रु.३००००/- पेक्षा कमी असल्याचा आवश्यक आहे. त्यामुळे पालकांना तहसिलदार यांचेकडून उत्पन्नाचे दाखले प्राप्त न झाल्यामुळे प्रस्ताव अपुरे प्राप्त झालेले आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.३२०००/- तरतूद करण्यात आली असुन त्याचा १३ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे.

६) इ. १ ली ते १० वी पर्यत सर्वांना मोफत शिक्षण

सदर योजनेअंतर्गत १ ली ते १० वी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्रे पालकांकडून शाळाकडे प्राप्त करुन घेतले जातात. तदनंतर एकत्रित प्रस्ताव शाळाकडन या कार्यालयास सादर केलेनंतर प्रस्तावाला अंतिम मंजूरी दिली जाते. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.२०९४०००/- तरतूद करण्यात आली असुन त्याचा १७७८४९ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे.

७) माजी सैनिकांच्या मुलांना मोफत शिक्षण

माजी सैनिक पाल्याकडून सैनिक कल्याण बोर्डाचा दाखला विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पाल्याचा/पालकांचे स्वाक्षरीने संबधित शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये यांचेकडून एकत्रित पात्र करुन प्रस्ताव या कार्यालयास सादर केले जातात. व प्रस्तावाना मंजूरी प्रदान केली जाते. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये र.रु.१०००००/- तरतूद करण्यात आली असुन त्याचा २३२ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. सदरच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात आलेला आहे.

८) टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्याना फि माफी

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्याना ई.बी.सी.प्रमाणे मंजूरी देण्यात येते.मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत ५० पैसे कमी आणेवारी असणा-या टंचाई गावांची घोषणा झाल्यानंतर संबधित गावतील इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्याना परीक्षा फि प्रतिपूर्ती करण्यात येते.

९) माध्यमिक शाळेतील मुलीना राष्ट्रीय योजनेतून रु.३०००/- प्रोत्साहन भत्ता

सदरची योजना एस.सी/एन.टी.मधील वय वर्ष १६ पूर्ण न झालेलया विद्याथ्यानीसाठीच लागू आहे. अविवाहित मुलीनाच सदरची योजना लागू आहे.तसेच शासकिय/शासन/अनुदानीत/स्थानिक संस्थेतील इ.९ वी मध्ये शिकत असलेल्या मुलीसाठीच ही योजना लागू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - रोजगार हमी फोटो