शिक्षण (प्राथमिक) विभाग

शिक्षण (प्राथमिक) विभाग

शिक्षण (प्राथमिक) विभाग माहिती 2023 : -पाहण्यासाठी क्लिक करा

शिक्षक विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सातारा यांचे मार्फंत राबविण्यात येणा-या विविध योजना

१) केंद्र शाळा स्तरावर क्रिडा स्पर्धा व बालआनंद मेळावे आयोजीत करणे

जिल्हा परिषदेच्या इ. १ ली ते ७ वी च्या प्राथमिक शाळा मधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

२) स्व.मा.आ.अभयसिहराजे भोसले यांची जर्येती साजरी करणे

जिल्हयातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणेत येतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होवून अभ्यास करण्याची जिद निर्माण होते.

३) महात्मा ज्येतिबा फुले जयंती समारंभ मौजे कटगुण ता- खटाव येथे साजरी करणे

थोर महात्याम्यांची कार्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी नामवंत वक्त्यांची व्याख्याने आयोजीत केली जातात.

४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी यांना स्काऊट गाईडचे प्रशिक्षण आयोजीत करणे

या योजनेमधून शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी यांना नवनविन उपक्रमांची माहिती दिली जाते.

५) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभ मौजे नायगाव ता- खंडाळा

जयंती दिवशी मौजे नायगाव येथे कार्यक्रम आयोजीत केला जाते. त्यामध्ये जिल्हयामधील विविध स्पर्धे मध्ये विशेष प्राविन्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.

६) जिल्हयातील गुणवान विद्यार्थी व उत्कृष्ठ खेळाडू सत्कार समारंभ करणे

जिल्हयातील १० वी व १२ वी व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते.

७) शिक्षक दिन

तालुक्यांतील १ आदर्श शिक्षकांचा निवड करताना त्याची सेवा १५ वर्ष पूर्ण असावी व त्याचे गोपनीय अहवाल उत्कृष्ठ असणे आवश्यक व चारित्र्य पडताळणी गरजेचे असावी लागते अशाच शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो.

८) हस्ताक्षर स्पर्धा

विद्यार्थ्यांचे अक्षर सुरेख व वळणदार होण्यासाठी या स्पर्धा आयोजीत केल्या जातात.प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जाते अशा एकूण ३३ निबंधामधून पुन्हा जिल्हास्तरावर प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण केले जाते.

९) गीतमंच स्पर्धा

विद्यार्थ्यांचे अंगभत कला गुणांचा विकास व्हावा या स्पर्धा आयोजीत केल्या जातात. प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जाते अशा एकूण ३३ निबंधामधून पुन्हा जिल्हास्तरावर प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण केले जाते.

१०) प्रश्नमंजूषा स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ व्हावी म्हणून या स्पर्धा आयोजीत केल्या जातात. प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जाते अशा एकूण ३३ निबंधामधून पुन्हा जिल्हास्तरावर प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण केले जाते.

११) हस्तलिखित स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा लेख,विनोदी चुटके,संग्रहीत चित्रे यांचे संकलन करुन हस्तलिखितांच्या या स्पर्धा आयोजीत केल्या जातात. प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जाते अशा एकूण ३३ निबंधामधून पुन्हा जिल्हास्तरावर प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण केले जाते.

१२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ साजरा केला जातो प्रत्येक तालूक्यातून इ.७वीचे तीन मागासवर्गी विद्यार्थ्याना गुणानुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकाना बक्षीस दिली जातात तसेच ज्या सामाजिक सस्थेचे उत्कृष्ठ कार्य करणा-या सस्थेस पुरस्काराने सन्मानित केले जाते जयंती दिवशी प्रमुख वकत्याचे भाषण ठेवले जाते.

१३) कै. बाळासाहेब देसाई जयंती समारंभ

कै.बाळासाहेब देसाई यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ पंचायत समिती पाटण मार्फत साजरा केला जातो

१४) क्रांतीसिह नानापाटील जयंती समारंभ

क्रांतीसिह नानापाटील यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ तालूका स्तरावर साजरा केला जातो प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जात

१५) कै.किसनवीर जयंती समारंभ

कै.किसनवीर यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ पंचायत समिती वाई मार्फत साजरा केला जातो

१६) केंद्रशाळा वसतीगृह तळदेव महाबळेश्वर

डोंगराळ व अति दूर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने जि.प.मार्फत केंद्रशाळा वसतीगृह तळदेव हे वसतीगृह चालविले जाते तेथील मुलांना जेवणासह निवासाची व्यवस्था केली जाते त्यासाठी १०० टक्के अनुदान जि.प.सेस मधून दिले जाते.

१७) यशवंत गुरूकूल योजना

डोंगराळ व अति दूर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने जि.प.मार्फत वसतीगृह चालविले जाते तेथील मुलांना जेवणासह निवासाची व्यवस्था केली जाते त्यासाठी १०० टक्के अनुदान जि.प.सेस मधून दिले जाते.सदर वस्तीगृहास यशवंत गुरुकुल असे संबोधले जाते. राजापुरी/सातारा,केरळ/पाटण,तापोळा-वाघावळे/म.श्वर या चार ठिकाणी यशवंत गुरुकुले आहेत.

१८) महाबळेश्वर तालूक्यास झडी व कोळसा पुरविणे

ज्या शाळांना अतिवृष्ठीमुळे पावसाळी सुटटी दिली जाते त्या महाबळेश्वर तालूक्यातील अतिवृष्टी होणा-या ६३ प्राथमिक शाळांना झडी व कोळसा पुरविला जातो.

१९) थोर महात्मे व समाजसुधारक यांच्या जंयती व पुण्यतिथी साजरी करणे

यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा केली जाते.

२०) सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील गरजू व होतकरु मुलीना शाळेत येण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहनपर भत्ता दिवसाला १/- प्रमाणे दिला जातो.

२१) दुर्बल घटकातील दारिद्रय रेषेखालील मुलीना उपस्थिती भत्ता वाटप करणे

अनुसूचीत जाती/जमाती इ.१ ली व ४ थी मधील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषखालील मुलीना शाळेत नियमित येण्यासाठी १/- दराप्रमाणे २२० दिवसाकरिता त्यांच्या पालकांना उपस्थिती भत्ता देण्यात येतो.

२२) दुर्बल घटकातील/दारिद्रय रेषेखालील मुलीना व मुलाना गणवेश व इतर सुविधा देणे

इ. १ ली ते ४ थी च्या वि.जा. व भ.ज. जमातीतील दारिद्रय रेषेखालील मुलांना प्रति गणवेष रु.५७.२१ प्रमाणे शैक्षणिक वर्षात दोन गणवेश संच वाटप करण्यात येतो

२३) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यासाठी उपस्थिती भत्ता देणे

अल्पंसख्याक इयत्ता ५ वी ते ७ वी च्या (मुले व मुली) विद्यार्थ्यांना शाळेत नियमीत येण्यासाठी प्रति दिन २/- प्रमाणे उपस्थिती भत्ता अदा करण्यात येतो. २२० दिवसासाठी देय राहील.

२४) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना गणवेश वाटप योजना

इ. १ ते ४ थी च्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना (मुले व मुली) शाळेत उपस्थिती वाढावी म्हणून प्रत्येकी २ गणवेशासाठी र.रु.४००/- खर्च केला जाते.

1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संख्या 2690
2 उर्दू शाळा संख्या 8
3 बहुशिक्षकी शाळा संख्या 941
4 द्वीशिक्षकी शाळा संख्या 1332
5 जिल्हा परिषद, शिक्षण सेवक संख्या 1332
6 जिल्हा परिषद, उपशिक्षक संख्या 5756
7 पदवीधर 1238
8 मुख्याध्यापक 81
9 केंद्रप्रमुख 49
10 शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग-3 श्रेणी-2 25
11 शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग-3 श्रेणी-3 2