सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणार्‍या विभागापैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक आसणार्‍या जिल्हा परिषदेकडील सर्व खात्याकडील प्रशासकीय प्रस्ताव प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.

सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्यते करुन जिल्हा परिषदेकडे केल्या जाणार्‍या सर्व नेमणुका पदोन्नत्या, जिल्हा बदल्या, नियतकालीक बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचार्‍यांना पुरस्कार कामाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सर्व साधारण सभा, स्थायी समिती सथा यांचे कामकाज पाहिले जाते. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व २ मधील अधिकारी व इतर वर्ग-१ व २ मधील अधिकारी यांचे आस्थापनेचे काम या विभागाकडे आहे. तालुक्यांतर्गत असणार्‍या गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, गट प्रशिक्षण अधिकारी, महिला व बाल कल्याण उपविभाग (बांधकाम व ग्रा.पा.पू.) , प्राथमिक आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, केंद्र शाळा, अंगणवाडया, यांचेमार्फत राबविणेत येणार्‍या शासनाच्या वेगवेगळया विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व यशस्वीपणे झाली आहे किवा नाही त्याचप्रमाणे प्रशासकिय कामांचा आढावा याची पहाणी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) यांचेमार्फत वार्षिक तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे मुख्यालयातील विभागांचीही वार्षिक तपासणी, तपासणी पथकामार्फत केली जाते व तपासणीद्वारे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो.

न्यायालयीन बाबी

जिल्हा परिषदेच्या काही निर्णय/आदेशा विरुध्द नाराजीने हक्कासाठी बरेचसे कर्मचारी न्यायालयात दाद मागतात. अशा दाव्यांचे प्रकरणी जिल्हा परिषदेची बाजू मांडणेची आवश्यकता असते. जिल्हा परिषदे विरुध्द कोर्ट प्रकरण दाखल झालेनंतर वकीलपत्र/प्राधिकारपत्र देण्यात येते व त्यांचे मार्फत न्यायालयीन कामकाज पहाण्यात येते. कायदे विषयक बाबींवर वकीलांचे कडून अभिप्राय प्राप्त करुन घेतले जातात. खाते प्रमुखांनी कायदेविषयक प्रकरणांची टिपणी सादर केल्यानंतर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने कायदे विषयक सल्ला उपलब्ध करुन दिला जातो.

परिषद शाखा

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडील या शाखेमार्फत सभांचे आयोजन करणे बाबत कामकाज करणेत येते. जिल्हा परिषद सदस्यांचे नांव, पत्ता, मतदार संघ व पक्ष याबाबतची माहिती या विभागाकडे उपलब्ध आहे.